पुणे

पुणे-बारामती सायकल स्पर्धा उद्या

CD

पुणे, ता. १७ ः पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारी राष्ट्रीय व राज्यस्तरावरील ‘पुणे-बारामती सायकल स्पर्धा’ शनिवारी (ता. १९) होणार आहे. हे या स्पर्धेचे नववे वर्ष असल्याची माहिती मंडळाचे मानद सचिव ॲड. संदीप कदम यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, खजिनदार ॲड. मोहन देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) ए. एम. जाधव उपस्थित होते. ‘‘मंडळाचे तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या सायकल स्पर्धेचे आयोजन केले आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने व सहकार्याने ही स्पर्धा होणार आहे,’’ असे कदम यांनी सांगितले.
एकूण सहा गटांमध्ये ही स्पर्धा होणार असून, राष्ट्रीय व राज्यस्तरावरील स्पर्धेचा मार्ग सुमारे १२२ किलोमीटरचा आहे. यातील राष्ट्रीय स्तरावरील गटात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुमारे ५०० स्पर्धक आणि राज्य स्तरावरील गटात सुमारे ३५० स्पर्धक सहभागी होणार आहेत. मुख्य स्पर्धेला हडपसरपासून सकाळी नऊ वाजता प्रारंभ होणार असून ‘एमटीबी’ सायकल स्पर्धा सासवड ते बारामती या मार्गावर होणार आहे.
स्पर्धेच्या निमित्ताने समाज प्रबोधनासाठी शनिवारवाडा ते हडपसरपर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली सर्वांसाठी खुली असून सकाळी आठ वाजता शनिवारवाडा येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते रॅलीचे उद्‍घाटन होणार आहे. स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा बारामतीतील ग. दि. मा. सभागृहात दुपारी अडीच वाजता होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Honeytrap: हनीट्रॅपच्या भीतीने अनेक पोलिस अधिकाऱ्यांना करावे लागले बार डान्सरशी लग्न! मुंबईतील धक्कादायक खुलासा!

Latest Maharashtra News Updates : राज्यभर परिचारिकांचा बेमुदत संप सुरूच; निर्णय होईपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा

Leopard Cubs: कोंढाळीतील शेतात आढळली बिबट्याची दोन पिल्ले

Pune Crime : सराईत गुन्हेगाराचा पोलिस ठाण्यात गोंधळ; सहकारनगरमध्ये पोलिसांच्या चेहऱ्यावर मारला स्प्रे

Nag River Drowning: नाग नदीत पाय घसरून बुडाला तरुण;साळवा गावाजवळील घटना, गुरे चारण्‍यासाठी जाणे ठरले शेवटचे

SCROLL FOR NEXT