पुणे

राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत शिवाजी मित्र मंडळ प्रथम

CD

पुणे, ता. १८ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२४ चा पुणे विभागाचा निकाल जाहीर करण्यात आला. या स्पर्धेच्या पुणे महापालिका क्षेत्र विभागात भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला, अशी घोषणा ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी आणि सरचिटणीस व आमदार हेमंत रासने यांनी शुक्रवारी (ता. १८) पत्रकार परिषदेत केली.

याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांच्यासह सुवर्णयुग तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. स्पर्धेत पुणे विभागात एरंडवण्यातील श्री शनी मारुती बाल गणेश मंडळाने द्वितीय, नाना पेठेतील पोटसुळ्या मारुती मंडळाने तृतीय, नवी खडकी येरवडा येथील नवज्योत मित्र मंडळ ट्रस्टने चौथा आणि भांडारकर रस्त्यावरील विनायक नवयुग मित्र मंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. स्पर्धेत सहभागी झालेली १९४ मंडळे व शाळांपैकी १०६ मंडळे व शाळांनी पारितोषिके मिळविली असून, त्यांना एकूण १४ लाख ९५ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवारी (ता. २०) सायंकाळी सहा वाजता स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बानवकुळे यांच्या हस्ते होणार असून, पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार उपस्थित राहणार आहेत. यंदा ‘जय गणेश भूषण पुरस्कार’ कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळाला देण्यात येणार असून, त्यांना एक लाख रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात येईल.

अन्य काही पारितोषिके
महोत्सवी वर्ष असलेली गणेश मंडळे : श्री नवचैतन्य मंडळ, कॅम्प (७५ वर्षे), सुयोग मित्र मंडळ, गोखलेनगर, नरवीर तरुण मंडळ, शिवाजीनगर गावठाण (५० वर्षे).
दिव्यांग शाळा विभाग : कामायनी विद्या मंदिर, गोखलेनगर, मूकबधिर शिक्षण व संशोधन केंद्र, आपटे रस्ता, बालकल्याण संस्था, औंध.
बाल मित्र मंडळ : श्रीराम बाल मित्र मंडळ, सोमवार पेठ आणि अथर्व बाल मित्र मंडळ, गुरुवार पेठ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Kishor injured: प्रशांत किशोर यांना रॅलीदरम्यान मोठी दुखापत; पाटणामधील रूग्णालयात उपचार सुरू!

Shocking! अनेकांसोबत शारीरिक संबंध; १०० कोटी उकळले, 'ती' महिला नेमकी कोण? धक्कादायक सत्य समोर

Pahalgam attack: 'टीआरएफ'चा जागतिक दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश; भारताकडून निर्णयाचं स्वागत

Raj Thackeray Warning Nishikant Dubey: ‘’दुबे तुम मुंबई मै आजाओ.., समंदर मै डुबे डुबे कर मारेंगें...’’ ; राज ठाकरेंचा कडक पलटवार!

Sangli Poisoning : कर्जबाजारी कुटुंबाने उचलेले टोकाचे पाऊल! विषप्राशनाने सासू-सुनेचा मृत्यू, वडीलांसह मुलाची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT