पुणे

पाककलेवर आधारित ‘श्रावण महोत्सव’

CD

पुणे, ता. १८ : राज्यातील महिलांना आपल्या पाककलेचं प्रदर्शन करण्यासाठी मिती ग्रुपतर्फे ‘श्रावण महोत्सव २०२५’चे आयोजन २५ जुलैपासून करण्यात आले आहे. स्पर्धेचं हे अकरावे वर्ष असल्याने ११ शहरांमध्ये ती पार पडणार असून, ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
स्पर्धेची सुरुवात ठाणे येथून २५ जुलै रोजी होणार असून दादर, गोरेगाव येथे प्राथमिक फेऱ्या पार पडणार आहेत. त्यानंतर पालघर, पनवेल, डोंबिवली, वसई, नाशिक, कांदिवली, गिरगाव आणि पुणे या शहरांमध्येही या फेऱ्या पार पडणार आहे. तसेच या स्पर्धेत लकी ड्रॉ, प्रश्नमंजूषा, मजेशीर खेळ असणार आहेत. महाअंतिम फेरीत पहिल्या तीन विजेत्यांना पैठणीची भेट मिळणार आहे. तर पहिल्या दोन विजेत्यांना दुबई आणि थायलंडची सहल जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. प्रदर्शनात विविध उत्पादनांचे स्टॉल्सही लावण्यात येणार असून, ग्राहकांना तिथे सवलतीच्या दरात खरेदी करता येणार आहे.
‘‘श्रावण महोत्सव २०२५ हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर महिलांना एक व्यासपीठ देणारा, त्यांच्यातील कलागुणांना उजाळा देणारा आहे. त्यामुळे प्रत्येक शहरातील महिलांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे आणि बहारदार भेटवस्तूंचा लाभ घ्यावा,’’ असे आवाहन मिती ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालक उत्तरा मोने यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Cylinder Shortage : हॉटेल व्यावसायिक गॅसवर! व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा मर्यादीत, पाइपलाइन गॅसचा ८० टक्केच वापर करण्याची सूचना

Porsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला जामीन मंजूर

Latest Marathi News Update : राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Disabled Scheme: तब्बल ३० वर्षांनंतर मोठा बदल! महायुती सरकारने दिव्यांगांसाठी आर्थिक मदत ₹१५,००० पर्यंत वाढवली; अर्ज कसा करायचा?

Women Employees: महिला कर्मचाऱ्यांसाठी गेम-चेंजर निर्णय! ‘लवकर या-लवकर जा’ योजना जाहीर; लाभ कसा घेता येणार?

SCROLL FOR NEXT