पुणे

‘पीएमपी’ची पर्यटन बससेवा क्रमांक ११ सुरू

CD

​पुणे, ता. १८ : पुणे महानगर परिवहन महामंडळाने नुकत्याच सुरू केलेल्या पर्यटन बससेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून, शुक्रवारी पर्यटन बससेवा क्र.११ ला परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते सुरुवात झाली. याप्रसंगी ‘पीएमपीएमएल’चे मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे, वाहतूक नियोजन अधिकारी नारायण करडे, कामगार व जनता संपर्क अधिकारी किशोर चौहान, पुणे स्टेशन आगार व्यवस्थापक शैलेश जगताप, सांख्यिकी अधिकारी राजेश बुनगे आदी उपस्थित होते. पहिल्याच दिवशी तीन बस मार्गस्थ झाल्या असून, या वेळी एकूण ९९ पर्यटकांनी तिकिटाचे आरक्षण केले.
या वेळी मुधोळ-मुंडे म्हणाल्या, ‘‘पीएमपीएमएलच्या पर्यटन बससेवेला महिला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पर्यटन बससेवेचा लाभ जास्तीत जास्त पर्यटकांनी घ्यावा. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांच्या धार्मिक व पर्यटन स्थळांकरिता एकूण ११ पर्यटन बस मार्ग निश्चित केले असून, पर्यावरणपूरक व वातानुकूलित ई-बसद्वारे विशेष ‘पर्यटन बससेवा’ सुरू आहे.’’
बससेवा मार्ग स्वारगेट, डेक्कन जिमखाना, एकवीरादेवी मंदिर/कार्ला लेणी, लोणावळा रेल्वे स्टेशन (येथे बस पार्किंग केल्यानंतर पर्यटकांना स्वखर्चाने इतर खासगी वाहनाने भुशी धरण, मनःशक्ती ध्यान केंद्र, व्हॅक्स म्युझियम आणि इतर प्रेक्षणीय स्थळांना भेट देता येईल) व परत स्वारगेट.

पर्यटन बससेवेबाबत इतर माहिती
- ३३ प्रवाशांचे ग्रुप तिकीट काढल्यास पाच प्रवाशांचे बुकिंग मोफत
- सर्व पर्यटन बससेवांसाठी दर प्रतिव्यक्ती ५०० रुपये
- पर्यटन बससेवेसाठी बुकिंग डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, पुणे मनपा भवन, निगडी, भोसरी बसस्थानक या केंद्रांवरून करता येते
- सदरील तिकिटावर अन्य मार्गाच्या बसमधून प्रवास करण्याची मुभा राहील.
- प्रवाशांना माहिती देण्यासाठी प्रत्येक बसमध्ये गाइड सेवक उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Assembly Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का..? पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष...

राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय! सात दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांचे होणार समायोजन; दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचे सीईओंना निर्देश..

Pune Crime: जागेच्या वादावरून दिराकडून सख्या भावजयीवर कोयत्याने सापासप वार; आंबेगाव तालुक्यात खळबळ, आधी दिली हाेती धमकी!

Numerology : 'या' 4 मूलांकाचे लोक असतात सगळ्यात जास्त घातक; तोंडावरून वाटतात साधेभोळे, पण कधी तुमचा काटा काढतील कळणारही नाही

Gas Price: महागाईच्या काळात दिलासा! गॅस दरात मोठी घसरण; नवे दर काय अन् कधीपासून लागू होणार? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT