पुणे

चुलत भावाच्या खुनाचा प्रयत्न

CD

पुणे, ता. १८ ः कौटुंबिक भांडणातून चुलत भावाच्या डोक्‍यात सिमेंटचा गट्टू मारून त्याच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना बुधवारी (ता. १६) पर्वती दर्शन परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे.
आदेश संजय काळे (वय ४१, रा. पर्वती दर्शन) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे, तर अमित काळे असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी एका महिलेने पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची मुलगी घरातून निघून गेली होती. मुलीला पळून जाण्यास आरोपी आदेश काळेने मदत केल्याचा संशय महिलेला होता. याबाबत अमितने त्याचा चुलतभाऊ आदेश यास जाब विचारला होता. त्यावरून बुधवारी त्यांच्यात वाद झाला. या वादाच्या रागातूनच आदेशने अमितच्या डोक्‍यात सिमेंटचा गट्टू मारला. त्यामध्ये अमित गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी आदेशला अटक केली आहे.
--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे जागतिक शेअर बाजारात भूकंप, 'या' कंपन्यांचे शेअर्स गडगडले

Manoj Jarange Patil: सातारा गॅझेट लागू न झाल्यास पुन्हा आंदोलन: मनोज जरांगे पाटील, सात तारखेपर्यंत सकारात्मक निर्णय अपेक्षित!

Sahyadri tiger reserve update : ‘सह्याद्री प्रकल्प’मध्ये ‘शिलेदार’ची एन्ट्री, ‘तारा’सोबत जमणार का जोडी? निसर्गप्रेमींसाठी उत्सुकता

Israel-Iran war: इस्त्राईल–इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात पेट्रोल-डिझेल संपणार; अफवांमुळे पंपांवर वाहनधारकांच्या रांगा

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरण : नाशिकमधील डॉ. अमोल पाटीलला पोलिसांनी चौकशीसाठी घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT