पुणे

जड वाहनांसाठीचे निर्बंध चार दिवसांसाठी शिथिल प्रायोगिक स्तरावरील बदलानंतर लवकरच धोरणात्मक निर्णय

CD

पुणे, ता. १७ ः बांधकाम क्षेत्राशी संबंधित अवजड वाहनांसाठी असणारे निर्बंध पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने फक्त दोन शनिवार व दोन रविवारसाठी काही प्रमाणात शिथिल केले आहेत. हा बदल प्रायोगिक स्तरावर आहे. त्यानुसार बांधकाम क्षेत्रातील जड वाहनांना ठराविक वेळेत शहरात प्रवेश करता येणार आहे.
शहरात होणारी वाहतूक कोंडी व अपघातांच्या कारणांमुळे पुणे पोलिसांकडून जड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यात कोणताही बदल झालेला नाही. मात्र, शहरात मेट्रो, उड्डाणपूल आदी शासकीय प्रकल्प तसेच बांधकाम प्रकल्पांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागला. त्यामुळे प्रायोगिक स्तरावर निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. चार दिवसांचा अनुभव लक्षात घेऊन, पुढील धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणासह काही रस्ते रेड झोनमध्ये येत असल्याने त्यावर जड वाहनांना सरसकट बंदी नसेल. त्यांना सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री १० पर्यंत त्यांना वाहतूक करता येणार नाही. रेड झोनमध्ये नगर रस्त्यावरील काही रस्ते, जुना मुंबई पुणे महामार्गावरील पाटील इस्टेटच्या पुढे अभियांत्रिकी महाविद्यालय, गणेशखिंड रस्त्यावरील ब्रेमेन चौकाच्यापुढे विद्यापीठ चौकाकडे, ब्रेमेन चौकातून पुढे औंध परिहार चौकाकडे, औंध वाकड रस्त्यावरून महादजी शिंदे पुलाच्यापुढे, बाणेर रस्त्यावर राधा चौकाच्यापुढे बाणेर ते विद्यापीठ चौकापर्यंत, पाषाण सूस रस्ता, पौड रस्ता, कर्वे रस्ता/डीपी रस्ता, नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रोड), सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, कोंढवा आदी रस्त्यांचा समावेश आहे.

-----------------
काय आहे बदल
शनिवारी - १९ आणि २६ जुलै - सायंकाळी ४ ते रात्री १० ही वेळ वगळून उर्वरित वेळेत बांधकाम क्षेत्राशी संबंधित जड वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी असेल
रविवारी - २० आणि २७ जुलै - बांधकाम क्षेत्राशी संबंधित जड वाहनांना वाहतुकीसाठी पूर्ण वेळ परवानगी
(हा बदल प्रायोगिक स्तरावर दोन शनिवार आणि रविवारसाठीच आहे.)
-----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा नाही; सुनील तटकरे, भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वालाही विचारात घेणार

BAMU Admissions: पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पाच हजार जणांची नोंदणी; ५६ अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन अर्ज

Morning Breakfast Recipe: वीकेंडला सकाळी नाश्त्यात बनवा कुरकुरीत अन् हेल्दी पापड कोन

Chh. Sambhajinagar Crime: पाच लाखासाठी विवाहितेचा खून; पतीसह चार जणांना १० वर्षांची शिक्षा

CM Devendra Fadnavis : मुंबईत आवाज मराठी माणसाचाच; फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा

SCROLL FOR NEXT