पुणे

हिंजवडीत पूरस्थिती पुन्हा ओढवणार नाही

CD

पुणे, ता. २० : ‘‘हिंजवडीत पूरस्थिती पुन्हा ओढवणार नाही. मागील रविवारी अधिकाऱ्यांसह पाहणी केली. त्यावेळी दिलेल्या सूचनेनुसार काम सुरू झाले आहे. अनधिकृत बांधकामे हटविली जात आहेत. हिंजवडीत किती पाऊस पडतो, किती पाणी येते, कोणते ओढे बुजविले आहेत, याबाबत सर्वेक्षण सुरू आहे. ओढ्यांवर बांधलेल्या इमारती पाडण्याचे आदेश दिले आहेत. लक्ष्मी चौक ते उड्डाणपूल, घोटवडे-माण-हिंजवडी-मारुंजी-कासारसाई, पाषाण-सूस-पिरंगुट, म्हाळुंगे-घोटवडे या रस्त्यांची कामे करण्याची सूचना दिली आहे,’’ अशी माहिती पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
उपमुख्यमंत्री पवार यांनी हिंजवडीतील वाहतूक कोंडी, जिल्ह्यातील पुलांची सद्यःस्थिती आदी विषयांवर अधिकाऱ्यांची रविवारी बैठक घेतली. त्यानंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. कुंडमळा येथील दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील धोकादायक तसेच अतिधोकादायक पुलांची बांधकाम तपासणी (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डुडी यांनी दिले होते. त्यानुसार विविध यंत्रणांकडून आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात ६१ पूल हे धोकादायक असल्याचे आढळून आले. हे पूल तत्काळ पाडण्याचे आदेश जिल्हाधिकारी डुडी यांनी दिले आहेत. त्या परिस्थितीचा आढावा उपमुख्यमंत्री पवार यांनी घेतला.
पवार म्हणाले, ‘‘अधिवेशनात सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी राज्यातील धोकादायक पुलांच्या बाबतीत बांधकाम विभागाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी स्थापन केलेल्या समितीपेक्षा सचिवांची समिती वरिष्ठ आहे. त्यामुळे या समितीला जिल्हा प्रशासन सर्व माहिती देईल. रविवारी झालेल्या बैठकीत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील धोकादायक पुलांच्या बाबतीत माहिती दिली. काही पुलांची दुरुस्ती केली तर ते पूल वापरता येऊ शकतात. अशा पुलांसाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी दिला जाणार आहे. मात्र जे पूल जिने तसेच दुरुस्ती करूनही वापरणे शक्य होणार नाही, असे पूल पाडण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.’’

‘मला याबद्दल माहिती नाही’
सहकारनगर पोलिस ठाण्यामधील तोडफोडीच्या घटनेबाबत विचारले असता, पवार म्हणाले, ‘‘या घटनेवरून कायद्याचा धाक राहिला नाही, असं चित्र निर्माण होत आहे. पोलिसांवर जर नागरिक हात उचलत असतील तर अशा व्यक्तींना पोलिसी हिसका दाखविला जाईल. अशा घटना घडू नयेत, म्हणून पोलिसही काळजी घेत आहेत,’’ तर आमदार रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, यावर पवार म्हणाले, ‘‘मला याबद्दल माहिती नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fighter Jet Crash: मोठी बातमी! बांगलादेशमध्ये हवाई दलाचे विमान शाळेवर कोसळले, एकाचा मृत्यू, अनेक जखमी, Video Viral

अहान पांडे आणि अनित पड्डा आहेत तरी कोण? 'सैय्यारा'मधील गाजलेल्या 'या' जेन झी जोडीविषयी जाणून घ्या सर्वकाही

मुंबई विमानतळावर थरार! Air India फ्लाइटचे 3 टायर फुटले; मुसळधार पावसात नेमकं काय घडलं, प्रवाशांची काय स्थिती?

Harbhajan Singh: 'तूच माझ्या बाबाला मारलंस ना?' जेव्हा श्रीसंतच्या मुलीने हरभजनला केला थेट सवाल

Video : मैत्रीण दुबईत पोहोचली अन् मी अजून ट्रॅफिकमध्येच... बंगळुरुमधील महिलेचा व्हिडिओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT