पुणे

हॉस्पिटल अग्निसुरक्षा, संरक्षणवर संमेलन

CD

पुणे, ता. २१ : फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया (एफएसएआय) पुणे विभाग आणि पुणे अग्निशमन दल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इंडिया फायर अँड सिक्युरिटी यात्रा’ अंतर्गत ‘हॉस्पिटल अग्निसुरक्षा आणि संरक्षण’ या विषयावर एक विशेष संमेलन पुण्‍यात आयोजित केले होते. या वेळी महाराष्ट्र अग्निशमन सेवेचे संचालक संतोष वारीक हे प्रमुख पाहुणे व महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे हे उपस्थित होते. यावेळी श्रीनिवास वल्लुरी, पंकज धारकर, एफएसएआयचे सुजल शाह, पुणे विभाग अध्यक्षा, अजित यादव सचिव, हृषीकेश मांजरेकर, अनुजा सावंत, मेजर प्रकाश कापडे, मनीष मोरे, डॉ. मीरा पी. शिराळकर तसेच उद्योग-व्यवसाय अर्किटेक्ट उत्पादक, विक्रते या क्षेत्रातील ३५० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. सुजल शाह यांनी ‘रुग्णालयातील आग ही विजेमुळे, चुकीच्या व्यवस्थापनामुळे किंवा तत्सम कारणांमुळे होऊ शकते. अशा आपत्तीमधून रुग्णांना सुरक्षित हलविणे, कर्मचारी प्रशिक्षण, तसेच आरोग्यसेवा व्यवस्थापन यावर सखोल चर्चा करण्यासाठीच हा सेमिनार आयोजित केला आहे,’ असे सांगितले. सूत्रसंचालन सिंपल जैन यांनी केले, तर अजित यादव यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'लालबाग राजा'च्या मुख्य गेटसमोर 'हिट अँड रन', २ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, एक जखमी

Ganpati Visarjan 2025 Live Updates : पुण्यातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, पाहा थेट प्रक्षेपण

आणखी एका अभिनेत्रीने सोडली 'तू ही रे माझा मितवा' मालिका; तिच्याजागी दिसणार 'ही' गाजलेली अभिनेत्री

Latest Maharashtra News Updates : राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस, अजमेर शहराला पावसाने झोडपलं

Srirampur Crime:'नशेच्या इंजेक्शनच्या तस्करीवर धडक कारवाई'; श्रीरामपूरमध्ये वाढते जाळे उघडकीस, तरुणाईसाठी धोक्याचा इशारा

SCROLL FOR NEXT