पुणे

ग्रामीण मुलींना सक्षम करण्याचे कार्य कौतुकास्पद

CD

पुणे, ता. २२ : ‘‘मुलींना चांगल्या शिक्षणाची संधी मिळाली, तर त्या स्वतःसह समाजाची प्रगती करतात. ग्रामीण भागातून पुण्यात शिकण्यासाठी येणाऱ्या मुलींना निवास-भोजनाची सोय करतानाच त्यांना व्यक्तिमत्त्व विकासाचे शिक्षण देऊन सक्षम करण्याचे कार्य कौतुकास्पद आहे,’’ असे मत उद्योजिका व सामाजिक कार्यकर्त्या लीला पूनावाला यांनी व्यक्त केले.
महिला सेवा मंडळ आणि विद्यार्थी साहाय्यक समितीने बांधलेल्या मुलींच्या वसतिगृहाचे उद्‍घाटन पूनावाला यांच्या हस्ते झाले, त्या वेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी मराठवाडा मित्र मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष व समितीचे विश्वस्त भाऊसाहेब जाधव, तुकाराम गायकवाड, महिला सेवा मंडळाच्या पुष्पा हेगडे, राखी शेट्टी, तनुजा पुसाळकर, समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, खजिनदार संजय अमृते, प्रकल्प समन्वयक प्रभाकर पाटील आदी उपस्थित होते.
रंजनकर म्हणाले, ‘‘स्वच्छता, समता, स्वावलंबन या त्रिसूत्रीवर समितीचे कार्य सुरू आहे. समितीची वसतिगृहे परिवर्तनाची केंद्रे आहेत. ग्रामीण भागातील मुलांना घडवणारे हे प्रारूप पुण्यासह बाहेरही विस्तारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हे एक देशकार्य असल्याच्या भावनेतून समिती काम करत आहे. नव्या वसतिगृहात ८० विद्यार्थिनींची सोय होणार आहे.’’
प्रभाकर पाटील यांनी वसतिगृह प्रकल्पाचा प्रवास उलगडला. समितीच्या कार्यकर्त्या सुप्रिया केळवकर यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. प्रतिभा घोरपडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चीनच्या पुन्हा कुरापती, 'मॅकमोहन लाइन'च्या ४० किमीवर एअरबेस; अरुणाचलपासून १०० किमीवर विमानांसाठी ३६ हँगर

Shreyas Iyer: आता तर त्याला सोबतच घरी घेऊन जाऊ! सूर्यकुमार यादवने दिले श्रेयसच्या प्रकृतीचे अपडेट्स, मित्राची अवस्था पाहून...

Organic Banana Success : सोनईची केळी 'दुबई'च्या बाजारपेठेत; भुसारी परिवाराचे कौतुक; सेंद्रिय शेतीने अधिक उत्पन्नाची गोडी

Latest Marathi News Live Update : जैन बोर्डिंग होस्टेलच्या व्यवहारातील २३० कोटींची गोठवा- रविंद्र धंगेकर

Solapur Accident:'टेंभुर्णी-पंढरपूर रोडवरील अपघातात २ मजुरांचा मृत्यू'; अज्ञात वाहनाची धडक, हातावर पोट अन्..

SCROLL FOR NEXT