पुणे

व्‍यसनमुक्‍तीसाठी चतुःसूत्री पाळा

CD

पुणे, ता. २३ : ‘‘समाजाला व्यसनमुक्त करायचे असेल तर प्रतिबंध, पुनर्वसन, मानसिक आरोग्य समुपदेशन आणि धोरण वकिली या चतुःसूत्रींवर काम करणे गरजेचे आहे, तरच समाज व्यसनमुक्त होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकेल,’’ असे मत मनोदय व्यसनमुक्ती संस्थेचे संचालक डॉ. विष्णू श्रीमंगले यांनी व्यक्त केले.

नवी पेठेतील एस. एम. जोशी हॉलमध्ये बुधवारी (ता. २३) मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने गोलमेज परिषद पार पडली. या वेळी ते बोलत होते. कुटुंबातील नातेसंबंध, सकारात्मक संवाद, मैत्री, पालकांची पाल्यांसाठी उपलब्धता समजून घेणे आवश्यक आहे, तसेच शारीरिक, मानसिक, कौटुंबिक स्वास्थ्य राखत त्यावर काम करणे गरजेचे आहे, असेही ते म्‍हणाले.

या वेळी मनोदय संस्थेच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना, मानसिक आरोग्य आणि समुपदेशन, पुनर्वसन केंद्र आणि धोरण वकिली या चार विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संस्थेच्या विश्वस्त मालती गाडगीळ, रणजित गाडगीळ, व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाचे अविनाश पाटील, जिज्ञासा मार्गदर्शन आणि समुपदेशन, ज्ञान प्रबोधिनी, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र आदी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
...............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhanagari Dam : राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Shashikant Shinde : सध्याचे सरकार हे राज्याची तिजोरी रिकामी करून आलेले सरकार; महापालिका निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे दिले आदेश

Narayangaon Crime : लूटमार करणाऱ्या तीन गावगुंडांवर गुन्हा दाखल; दोन आरोपींना अटक

Indapur News : क्रिकेट खेळताना 32 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

Maharashtra Rain: २६ जुलैची बदलापूरकरांना पुन्हा भरली धडकी! नदीने गाठली पातळी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

SCROLL FOR NEXT