पुणे

कारगिल विजय दिवसानिमित्त उद्या शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे आयोजन

CD

पुणे, ता. १९ : कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून, फर्ग्युसन महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेतर्फे (एनसीसी) शनिवारी (ता. २६) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आहे. यामध्ये विजय रन मॅरेथॉन, पोस्टर प्रदर्शन स्पर्धा, आधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आणि निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या व्याख्यानाचा समावेश आहे.
फर्ग्युसन महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे सहयोगी एनसीसी अधिकारी नंदकुमार बोराडे म्हणाले, ‘‘कारगिल युद्धातील हुताम्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि युवकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना रुजविण्यासाठी हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शनिवारी सकाळी पाच वाजता ‘विजय रन’ मॅरेथॉनने या दिवसाची सुरुवात होईल. ही मॅरेथॉन कारगिल युद्धातील विजयाचे प्रतीक म्हणून धावणाऱ्या वीरांसाठी समर्पित असेल. त्यानंतर, सकाळी नऊ वाजता पोस्टर प्रदर्शन स्पर्धा आयोजित केली जाईल. यात विद्यार्थ्यांना कारगिल युद्धाशी संबंधित चित्रे आणि संदेशांद्वारे आपली सर्जनशीलता व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे.’’
या वेळी महाविद्यालय, शाळेतील विद्यार्थी यांसह ‘एनसीसी’ छात्रांसाठी सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत सेनेच्या आधुनिक शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. यात भारतीय सेनेद्वारे वापरली जाणारी अत्याधुनिक शस्त्रे विद्यार्थ्यांना जवळून पाहता येतील. यामुळे संरक्षण दलांच्या कार्यक्षमतेची आणि सामर्थ्याची थेट ओळख होईल. यासोबतच, मेजर जनरल (निवृत्त) विक्रम सिंग राठोड यांचे ‘गणवेशापलीकडची राष्ट्रसेवा : आजच्या तरुणाईची भूमिका’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित केल्याचे बोराडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT