सहस्रबुद्धे मंदिरात
मुखोद्गत घनपारायण
पुणे, ता. २५ ः शिवाजीनगर येथील श्री सहस्रबुद्धे समाधी मंदिरात श्रीसद्गुरू वासुदेवानंत सरस्वती पाठशाळेतील छात्र वे. मू. मंदार मधुकर क्षीरसागर यांचे मुखोद्गत घनपारायण पूर्ण झाले असून, नुकतीच त्याची सांगता झाली. या सोहळ्यात महाराष्ट्रातील विद्वान गुरुजी आणि भाविक उपस्थित होते.
पाठशाळेत ता. ८ जूनपासून हे पारायण सुरू आहे. मंदार क्षीरसागर हे या पाठशाळेतील दुसरे घनपाठी असून, या आधी मनोज जोगळेकर यांनी घनपारायण केले होते. वासुदेवानंत सरस्वती पाठशाळेतील या दोन छात्रांबरोबरच आजपर्यंत मंदिरात एकूण एक्कावन्न घनपारायणे करण्यात आली.
काय आहे घनपाठ?
- घनपाठ ही वेदपठणाची अतिशय कठीण पद्धती आहे.
- ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या वेदाच्या प्रमुख शाखा असून, प्रत्येक वेदाचे संहिता, ब्राह्मण, आरण्यक, आणि उपनिषद असे चार भाग आहेत.
- वेदात संकलित केलेले मंत्र स्वराचाही फरक न होता मूळच्या स्वरूपात पोहचतात.
कोण असतो घनपाठी?
ऋग्वेद संहितेचे घनपारायण करण्यास रोज ५ तास पारायण केले तरी सुमारे २ महिन्यांचा काळ लागू शकतो. यावेळी समोर संदर्भासाठी पोथी ठेवलेली नसते तर केवळ स्मरणाने ते उच्चारायचे असते. घनपाठाच्या वेळी एक विद्वान घनपाठी ‘श्रोता’ या नात्याने उपस्थित राहून पारायण अचूक होत आहे, याकडे लक्ष ठेवतो. संपूर्ण ऋक् संहितेचा घनपाठ मुखोद्गत करणाऱ्या वैदिकाला घनपाठी म्हणतात. घनपारायण करण्यासाठी श्रमाबरोबर धारणा शक्तीही तीव्र असावी लागते. घनपाठी होण्यासाठी उच्च दर्जाच्या, तल्लख व कुशाग्र बुद्धिमत्तेची आवश्यकता असते.
----
फोटो आयडी ः 34316
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.