आज पुण्यात २६ जुलै २०२५ शनिवार
......................
सकाळी ः
गणवेश वाटप ः विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे ः विद्यालयातील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप ः हस्ते- दत्तोबा तुपे ः अध्यक्ष- हरिभाऊ उंद्रे ः प्रमुख पाहुणे- सुदाम फुलारे ः विद्यालयात, भैरोबानाला, वानवडी ः १०.००.
द्विदशकपूर्ती कार्यक्रम ः ‘रेंज ऑफ होप’ प्रकल्पाचा २० वर्षे झाल्याबद्दल कार्यक्रम ः प्रमुख पाहुणे- डॉ. संजय मेहेंदळे ः उपस्थिती- अंजली बापट, सुनंदा टिल्लू, संजीवनी हिंगे ः गणेश सभागृह, एरंडवणे ः ११.००.
कायदा सल्ला ः मोफत कायद्याचा सल्ला केंद्र ः पुरुष, महिला व सर्वांसाठी कोर्ट केस आणि फॅमिली कोर्ट समझोता ः तज्ज्ञ वकील- ॲड. अनिल कांकरिया, ॲड. राहुल ढाले, ॲड. प्रकाश शितोळे, ॲड. विद्या पेळपकर, ॲड. संतोष जाधव ः काँग्रेस भवन, शिवाजीनगर ः ११.००.
दुपारी ः
पुरस्कार वितरण ः अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट आयोजित ः म्हसोबा उत्सवानिमित्त ः भूषण पुरस्कारांचे वितरण ः हस्ते- नीलम गोऱ्हे ः पुरस्कारार्थी- संजय चितळे, नीलेश भिंताडे, आनंद अग्रवाल, सविता मालपेकर, श्रीनिवास जोशी ः होम मिनिस्टर खेळ पैठणीचा- चालता-बोलता गेम शो ः ः ६१, शुक्रवार पेठ, महात्मा फुले मंडई, मंडई म्हसोबा चौक ः १२.००.
प्रकाशन सोहळा ः संस्थाचालक शिक्षण मंडळ, पुणे जिल्हा संस्थेतर्फे ः ‘यशोगाथा’ पुस्तकाचे प्रकाशन ः हस्ते- सुप्रिया सुळे ः अध्यक्ष- अशोक मोहोळ ः उपस्थिती- डॉ. गणपतराव मोरे, भाऊसाहेब कारेकर, विजय गव्हाणे व अन्य ः निसर्ग मंगल कार्यालय, मार्केट यार्ड ः २.००.
सत्कार सोहळा ः विद्या प्रबोधिनी आयोजित ः गुरुपौर्णिमेनिमित्ताने समाजगुरूंचा सत्कार सोहळा ः प्रमुख पाहुणे- चंद्रकांत पाटील ः सत्कारार्थी- भूषण गोखले, डॉ. शंकर अभ्यंकर, डॉ. रवी पंडित, माधव भांडारी, डॉ. सुनील भागवत, डॉ. विद्यासागर पंडित, मिलिंद कांबळे, निर्मला गोगटे, आशा खाडिलकर, डॉ. अविनाश भोंडवे, डॉ. राजेंद्र हिरेमठ, कालिदास मोरे ः कमिन्स इंजिनिअरिंग कॉलेज, के. बी. जोशी हॉल, कर्वेनगर ः ४.००.
सायंकाळी ः
पुस्तक प्रकाशन व पुरस्कार वितरण : समर्थ फाउंडेशन व वल्लरी प्रकाशन आयोजित ः ‘गगनभरारी’ पुस्तकाचे प्रकाशन व ‘गगनभरारी समर्थ पुरस्कार’ वितरण ः अध्यक्ष- प्रदीप रावत ः प्रमुख पाहुणे- प्रीत कौर, डॉ. भालचंद्र गायकवाड, दीपक मोकाशी, मानसी चिटणीस, किरण इनामदार, व्यंकटेश कल्याणकर ः सूत्रसंचालन- प्रज्ञा कल्याणकर ः माधवराव पटवर्धन सभागृह, महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता ः ५.००.
सांस्कृतिक कार्यक्रम ः कलाधाम फाउंडेशनतर्फे ः उदय उत्सव २०२५- नृत्य, गायन, वादन आणि संगीत माध्यमातून भारतीय संस्कृतीचा प्रचार व प्रसार ः ज्योत्स्ना भोळे सभागृह, शुक्रवार पेठ ः ५.००.
संगीत संध्या ः कलासक्त कल्चरल फाउंडेशन, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि आय.एम.ए. आर्ट सर्कलतर्फे ः डॉ. प्रांजल पंडित (एकल तबलावादन) व मृण्मयी भिडे (शास्त्रीय-उपशास्त्रीय) ः साथसंगत- सारंग जोशी, चिंतामणी वारणकर ः डॉ. के. एच. संचेती सभागृह, डॉ. नीतू मांडके आय. एम. ए. हाउस, टिळक रोड ः ५.३०.
अभिवाचन आणि सांगीतिक कार्यक्रम ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘गोल्डन मेमरीज’तर्फे- ‘म्हणती ज्ञानदेव’ ः संत ज्ञानेश्वरांच्या ७५०व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून, काही लोकप्रिय व नव्या रचनांसह अभिवाचन आणि गायनाचे सादरीकरण ः अभिवाचन- मयूर भावे ः साथसंगत- मिलिंद गुणे (संवादिनी), राजेंद्र हसबनीस (तबला), उद्धव कुंभार (तालवाद्य) आणि तुषार दीक्षित (कीबोर्ड) ः भारतीय विद्या भवन, सरदार महादेव बळवंत नातू सभागृह ः ६.००.
राख्यांचे पूजन ः सैनिक मित्र परिवार व श्रीमती दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आयोजित ः सीमेवरील सैनिकांसाठी पुणेकरांतर्फे राख्या ः महिला वर्ग आणि चिमुकल्यांच्या हस्ते राखीपूजन ः उपस्थिती- प्रतिभा मोडक, सुचेता भिडे-चापेकर, वंदना चव्हाण, रूपाली चाकणकर ः दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर, बुधवार पेठ ः ६.००.
चर्चासत्र ः शोधइको संस्था व पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशनतर्फे ः पॉलिसी रिसर्च, पॉलिसी ॲडव्होकसी आणि चर्चासत्रांच्या माध्यमातून ‘सामाजिक धोरण’ विषयावर जनजागृती ः विषय- ‘पुणे व कोल्हापूर महापालिकेच्या बजेटचे विश्लेषण’ ः अंतर्नाद योग केंद्र, करिष्मा सोसायटीच्या जवळ, कोथरूड ः ६.३०.
...............................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.