पुणे, ता. २५ : ‘‘सत्ताधाऱ्यांनी राज्याची तिजोरी रिकामी करून, भरमसाट पैसा निवडणुकीसाठी वापरला. त्यातूनच हे सरकार सत्तेवर आले. ५०-५० कोटी रुपये एका मतदारसंघावर खर्च केला. हा पैसा वापरला नसता तर आमच्या पक्षाचे अनेक आमदार विधिमंडळात दिसले असते.’’ अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सरकारवर टीका केली.
महापालिका निवडणुकीसाठीचा निर्णय तुम्ही घ्या. जनमत असलेल्या उमेदवारांची प्राथमिक यादी तयार करून कामाला लागा, असे
सांगत शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची प्राथमिक जबाबदारी शहराध्यक्षांवर सोपविली.
प्रदेशाध्यक्षपदी शिंदे यांची तर रोहित पवार यांची प्रदेश सरचिटणीसपदी (सर्व फ्रंटल व सेलचे प्रभारी) नियुक्ती झाल्याबद्दल पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने शिंदे व पवार यांचा शुक्रवारी पक्षाच्या कार्यालयासमोर सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार बापू पठारे, माजी आमदार व जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, श्रीकांत पाटील, प्रकाश म्हस्के, रवींद्र माळवदकर, ऍड.जयदेव गायकवाड, अंकुश काकडे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ॲड. नीलेश निकम, अश्विनी कदम, सुनील जगताप, भगवान साळुंखे, महिलाध्यक्ष स्वाती पोकळे, मृणालिनी वाणी आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘लोकसभेला आपण एकदिलाने लढलो पण विधानसभेवेळी आपण लोकांपर्यंत पोचलो नाही, त्याचा फटका बसला. त्या उणिवा आता दूर करून कामाला लागू. येत्या महापालिका निवडणुकीत इव्हीएम मॅनेज होणार नाही, याची काळजी घ्या. निवडणूक लढताना नेते, अधिकारी आडवे येतील. मात्र तुम्ही लोकांच्या प्रश्नावर लढत असल्यास पक्षाचे नेते तुमच्यासाठी पोलिस ठाण्यात आल्याशिवाय राहणार नाहीत. ’’
------
आवाज खाली...!
पक्षाच्या कार्यकर्त्यास मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर रोहित पवार यांची पोलिसांसमवेत बाचाबाची झाली होती. त्यावेळी पवार यांनी पोलिस अधिकाऱ्यास ‘आवाज खाली घेऊन बोलायचं’ अशा शब्दात सुनावले होते. त्यानुसार कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात पवार यांचे ‘आवाज खाली, रोहित दादा येताहेत’ असे फलक लावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
फोटो ः 34451
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.