पुणे

पुण्यात पुढील दोन दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस

CD

पुणे, ता. २६ : शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शनिवारी (ता. २६) उपस्थिती नोंदवली. पुढील दोन दिवसांत हवामानात फारसा बदल होणार नसल्याने हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. घाट विभागात मात्र पावसाचा जोर कायम राहणार असल्याने रविवारी (ता. २७) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
शहर आणि परिसरात सकाळी आठच्या सुमारास पडलेल्या संततधारेमुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. शनिवारी शहरात कमाल तापमानात किंचित घट झाली.
दरम्यान, गेल्या २४ तासांत ताम्हिणी परिसरात २५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर इतर भागात १५० मिलीमीटरहून अधिक पाऊस पडल्याची माहिती आहे. यामुळे घाट विभागात रविवारी (ता. २७) ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी खूप जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुणे आणि परिसरात रविवारी (ता. २७) कमाल तापमान स्थिर राहणार असून, कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस इतके तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात येणार आहे. आकाश अंशतः ढगाळ राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी (ता. २८) कमाल तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT