पुणे

‘एमईएमएस’ अधिकाऱ्यांकडून मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलनाचा इशारा

CD

पुणे, ता. २८ : ‘महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (एमईएमएस) १०८ डॉक्टर्स असोसिएशन’च्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिकाऱ्यांनी (इएमएसओ) विविध मागण्यांची पूर्तता न केल्‍यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. बीव्‍हीजी इंडिया लिमिटेड, सुमीत फॅसिलिटीज व एसएसजी प्रा. लि. या ठेका घेणाऱ्या कंपन्यांकडून आर्थिक, सामाजिक व मानसिक शोषण होत असल्‍याचा आरोप करत मागण्या तातडीने मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्‍याचा इशारा संस्थेचे सरचिटणीस डॉ. विश्वनाथ काकडे यांनी सोमवारी (ता. २८) पत्रकार परिषदेत दिला.

काकडे म्‍हणाले की, या सेवा अधिकाऱ्यांना गेल्या ११ वर्षांपासून ८ तासांच्या कामासाठी केवळ २२ हजार इतके मानधन मिळते. त्‍यामध्‍ये वाढ न देणे, सवेतन रजा नसणे व त्‍याचबरोबर ‘समान काम, समान वेतन’ या धोरणाची अंमलबजावणी केली जात नाही. कंपन्‍यांकडून ६० हजार प्रतिमाह वेतन (रीटेनरशिप फी) द्यावे, त्यात वार्षिक वाढ मिळावी, असंवैधानिक कपात करू नये, अधिक वेळ काम केल्यास त्याचे अतिरिक्‍त पैसे मिळावे, या मागण्‍या मांडल्‍या. तसेच आरोग्य व इतर विमा, प्रत्येक कर्मचाऱ्याचा काढावा, रुग्णवाहिकांमधून शव वाहून नेण्याची सक्ती बंद करावी, आदी मागण्या केल्‍या आहेत. या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, असे आवाहन देखील संघटनेतर्फे केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर माध्यमांमध्ये केलेला तमाशा, प्रणिती शिंदेंची लोकसभेत टीका, सरकारला प्रश्नांनी घेरले

ऑपरेशन सिंदूरच्या चर्चेत दिग्गजांना डावललं, काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस; माजी केंद्रीय मंत्र्याने म्हटलं, भारतात राहतो...

AI Fake Verdicts : तरुण वकिलांकडून AI निर्मित बनावट निकाल सादर; सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा इशारा

Gold producing bacteria : माती खाऊन बाहेर टाकतो २४ कॅरेट सोनं..! शास्त्रज्ञांना सापडला 'हा' अद्भुत बॅक्टेरिया

T20I Record: ९ चेंडू ५ विकेट्स! महेश तांबेचा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड; मोडला राशिद खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT