पुणे

पोलिसांवरील आरोप निराधार ः अमितेश कुमार

CD

पुणे, ता. २९ : माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी खराडी येथील कथित रेव्ह पार्टी प्रकरणात पुणे पोलिसांवर केलेले सर्व आरोप निराधार असल्याचे सांगत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्या आरोपांचे खंडन केले. पोलिसांनी अत्यंत पारदर्शकपणे आणि नियमानुसार कायदेशीर कारवाई केली असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
गणेश मंडळांच्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. अमितेश कुमार म्हणाले, ‘‘जे काही आरोप होत आहेत, ते सगळे निराधार आहेत. पोलिसांची कारवाई पारदर्शक, नियमानुसार आणि कायदेशीर आहे. या कारवाईची विस्तृत माहिती प्रसार माध्यमांना आधीच देण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या भूमिकेवर संशय घेण्याचे काही कारण नाही.’’ माध्यमांना किंवा इतर व्यक्तींना पोलिसांनी फोटो आणि व्हिडिओ दिले, असा आरोप केला जात आहे. याबाबत ते म्हणाले, ‘‘कुठल्याही प्रकारचे फोटो किंवा व्हिडिओ पोलिसांकडून देण्यात आले नाहीत. लोक फोटो किंवा व्हिडिओ काढत असतील तर त्यावर आम्ही बंधन घालू शकत नाही.’’
‘‘पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई केली. या कारवाईबाबत कुणीही मनात शंका घेऊ नये. आम्ही कुठल्याही प्रकारचा फोटो लीक केला नाही. कोणतेही व्हिडिओ पोलिसांकडून लीक करण्यात आले नाहीत,’’ असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad Crime: कऱ्हाडला ड्रग्जप्रकरणी तिघांना अटक; पावणेतीन लाखांचे एमडी जप्त, २५ लाखांचा अन्य ऐवजही ताब्यात

Washing Machine Tips : क्षमतेपेक्षा जास्त कपडे भरल्यास खराब होऊ शकते वॉशिंग मशीन; एका वेळी किती कपडे धुवावेत? जाणून घ्या

Pune weather: जूनच्या स्वागताला पावसाची चाहूल; पुण्यात मेघगर्जना आणि विजांचा इशारा, नैऋत्य मोसमी पावसाची प्रगती

IPL 2026: RR चा फक्त १ कोटीचा जुगार; १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने ३३.८७ कोटींचा नफा कसा कमावला? पाहा संपूर्ण गणित

Ahilyanagar Crime: अहिल्यानगरात थरारक घटना; मुरुम चोरी उघडकीस आणणाऱ्या तरुणांचा पाठलाग जीवावर बेतला, जेसीबीच्या धडकेत एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT