पुणे

अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त उद्या वाहतूक मार्गात बदल

CD

पुणे, ता. ३० : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एक ऑगस्टला सारसबाग येथील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या वेळी रस्त्यावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. हे बदल शुक्रवारी (ता. १) सकाळी सात वाजल्यापासून लागू राहतील.

जेधे चौकातून सारसबागकडे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद राहील. जेधे चौकातील वाय-जंक्शनवरून (फ्लायओव्हर) सारसबागेकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी असेल. वेगा सेंटर ते सारसबाग ग्रेडसेपरेटरमधून वाहनांना प्रवेश बंद राहील. स्वातंत्र्यवीर सावरकर चौक ते पूरम चौकदरम्यान, दांडेकर पूल सिंहगड जंक्शनहून स्वातंत्र्यवीर सावरकर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहील. पूरम चौक ते जेधे चौक या रस्त्यावर एकेरी वाहतुकीला शिथिलता देऊन दुहेरी वाहतूक सुरू ठेवण्यात येईल. दांडेकर पूल आणि स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथील वाहतूक आवश्यकतेनुसार दुपारी तीन ते रात्री बारा वाजेपर्यंत शिथिल केली जाईल. नीलायम पुलावरून स्वातंत्र्यवीर सावरकर चौकाकडे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार पर्वती गाव मार्गे वळविण्यात येईल.

पर्यायी मार्ग :
सिंहगड रस्त्याकडे जाण्यासाठी :
जेधे चौक- सातारा रस्ता- व्होल्गा चौक- मित्रमंडळ चौक- स्वातंत्र्यवीर सावरकर चौक- सिंहगड रस्ता.
सिंहगड रस्त्याहून स्वारगेटकडे येण्यासाठी :
दांडेकर पूल- नाथ पै चौक- ना. सी. फडके चौक- पूरम चौक- लोकमान्य टिळक रस्ता- जेधे चौक.
कात्रजकडून सारसबागेकडे जाण्यासाठी :
लक्ष्मीनारायण (व्होल्गा चौक) मार्गे डावीकडे वळावे.
वेगा सेंटरपासून राष्ट्रभूषण चौक, हिराबाग चौक मार्गे इच्छित स्थळी जाता येईल.
नाथ पै चौक- स्वातंत्र्यवीर सावरकर चौक- दांडेकर पूल- लोकमान्य टिळक रस्तामार्गे इच्छित स्थळी जाण्यासाठी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: पेविंग ब्लॉकच्या खड्ड्यामुळे ज्येष्ठ नागरिकाचा जीव गेला; पुण्यातल्या 'या' मृत्यूला कोण जबाबदार?

Anil Ambani: अनिल अंबानींची ईडी करणार चौकशी; 17 हजार कोटींचा कर्ज घोटाळा, तपासात काय आढळले?

Tarot Horoscope August 2025: राज राजेश्वर योगामुळे मेष, मिथुनसह ४ राशींना लाभ; वाचा ऑगस्टचे टॅरो राशीभविष्य

Solapur News:'शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंतांचा संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा'; निवडणुकीच्या तोंडावर गटबाजी

August Long Weekend: ऑगस्टमध्ये लॉंग वीकेंड प्लॅनिंग करताय? मग 'या' तारखा नक्की लक्षात ठेवा, आनंद दुपटीने वाढेल!

SCROLL FOR NEXT