पुणे

नारायण पेठेतील जुगार अड्ड्यावर छापा सहाय्यक फौजदार निलंबित, ३२ जणांविरोधात गुन्हा

CD

पुणे, ता. १ : नारायण पेठेतील महापालिकेच्या वाहनतळामधील जुगार अड्ड्यावर गुरुवारी रात्री विश्रामबाग पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. याप्रकरणी ३२ जणांविरोधात जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, जुगार खेळताना आढळलेल्या एका सहाय्यक फौजदारास निलंबित करण्यात आले आहे.
विश्रामबाग पोलिसांनी या कारवाईत एक लाख ६९ हजारांची रोकड, २५ मोबाईल फोन, पत्त्यांचे कॅट असा एकूण चार लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण पेठेतील मोदी गणपतीजवळ महापालिकेचे ‘क्रीडामहर्षी हरिभाऊ साने वाहनतळ’ आहे. हे वाहनतळ खासगी ठेकेदारामार्फत चालवण्यास दिले आहे. मात्र, येथे पत्त्याचा जुगार सुरू असल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांना मिळताच गुरुवारी रात्री छापा टाकला. या ठिकाणी शहरातील सदाशिव पेठ, नारायण पेठ, गुरुवार पेठ, कात्रज, मार्केट यार्ड, सहकारनगर, बिबवेवाडी, पाषाण, मांजरी, कोंढवा, नऱ्हे, सिंहगड रस्ता, कोरेगाव पार्क, एरंडवणे आदी भागातील काही जण जुगार खेळताना आढळून आले. त्यात काही व्यापारीही असल्याचे समोर आले आहे. ही कारवाई परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) अरुण घोडके, सहाय्यक निरीक्षक राजेश उसगावकर आणि त्यांच्या पथकाने केली.
या छाप्यात पोलिस मुख्यालयातील सहाय्यक फौजदार महेश भुतकर हे जुगार खेळताना आढळून आले. संबंधित फौजदाराविरोधात तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त (मुख्यालय) राजलक्ष्मी शिवणकर यांनी ही कारवाई केली.
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Audio Clip : मनोज जरांगे पाटील यांच्या ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर ठाकरे गटातील बड्या नेत्याची एन्ट्री, म्हणाले कुवत पाहा

Nagpur Weather: पूर्व विदर्भात पुढील आठवड्यात पावसाची शक्यता

टाइगर श्रॉफच्या शूटिंग प्रकरणात मोठी अपडेट! टीव्ही न्यूजच्या आधारे शूटर्सना मास्टरमाइंडच्या सूचना, ११ जणांना अटक

Latest Marathi News Update : खासगी फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत प्रशासनाची बैठक

'जी आग लागायची ती लागली', राज ठाकरेंची सरकारवर खरमरीत टीका, 'लाव रे तो व्हिडिओ' मालिकेतील जुना व्हिडिओ पुन्हा शेअर करत म्हणाले...

SCROLL FOR NEXT