पुणे

‘आयुका’त विद्यार्थ्यांच्या मुलाखती

CD

पुणे, ता. ३ : इस्रो आणि नासा अंतराळ संशोधन केंद्र भेटीसाठी विद्यार्थ्यांच्या निवड प्रक्रियेमधील आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र व खगोलभौतिकशास्त्र केंद्रात (आयुका) मुलाखतीसाठी २३५ विद्यार्थी जाणार असल्याचे निश्चित झाले. दुसऱ्या ऑनलाइन परीक्षेमधून १३ टक्के विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, यामधूनच अंतिम ७५ विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना इस्रो आणि नासा या अंतराळ संशोधन संस्थांना भेटीची संधी मिळावी, यासाठी तीन टप्प्यांत होणाऱ्या चाचणी परीक्षांचे नियोजन करण्यात आले. त्यापैकी एक लेखी परीक्षा आणि दुसरी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. आता ‘आयुका’मध्ये विद्यार्थ्यांच्या मुलाखती होणार आहेत. सर्व तालुक्यांतील विद्यार्थ्यांना या भेटीसाठी प्रतिनिधित्व मिळावे यासाठी पहिल्या परीक्षेमध्ये तालुक्यातून परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी १० टक्के जणांची निवड दुसऱ्या निवड चाचणीसाठी करण्यात आली. तसेच दुसऱ्या निवड चाचणीत तालुकानिहाय १३ टक्के विद्यार्थ्यांची निवड मुलाखतीसाठी केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.

‘आयुका’कडून अभ्यासक्रम निर्मिती
जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी आयुका या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला. यामध्ये सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विज्ञान संस्थांमध्ये प्रत्यक्ष जाऊन अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आणि अंतराळ विज्ञानाविषयी गोडी निर्माण करण्याचा मुख्य उद्देश असल्याचे गजानन पाटील यांनी सांगितले.


परीक्षेबाबत...
१६ हजार १२१
- विद्यार्थ्यांनी केलेले अर्ज

१३ हजार ६७१
- पहिली परीक्षा दिलेले विद्यार्थी

एक हजार ५४१
- दुसरी परीक्षा दिलेले विद्यार्थी

२३५
- मुलाखतीसाठी पात्र विद्यार्थी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

Pune Latest News: युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बंदोबस्त वाढवला; शहरात किती इराणी लोक राहतात?

धक्कादायक! आई-वडिल अभ्यास कर म्हणाले, मोबाईल न दिल्याने १३ वर्षीय विद्यार्थ्याने केली आत्महत्या; मोहोळ तालुक्यातील पेनूरमधील घटना

Latest Marathi News Live Update: शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत?

SCROLL FOR NEXT