पुणे

गणेश मंडळ पदाधिकारी म्हणतात...

CD

डॉ. मिलिंद भोई (पुणे विघ्नहर्ता न्यास) : यंदाच्या गणेशोत्सवात जास्तीत जास्त मंडळांनी समाज प्रबोधन होईल, असे देखावे निर्माण करावेत. त्यांना योग्य प्रसिद्धी मिळाल्यास ते नागरिकांपर्यंत पोचतील. सध्या विविध मंडळांमधील सुसंवाद हरवला आहे. आपण सर्व एकमेकांकडे संशयाने बघत आहोत. मतभेद न राहता मिरवणुकीतील समस्येबाबत सुवर्णमध्य काढायला हवा.

राहुल खाडे : मिरवणुकीच्या वेळी पूर्व आणि पश्चिम असे भाग होतात. एकीकडे गर्दी असते आणि दुसरीकडे नाही. हे सर्व नियोजन कोण करते व त्यात काय बदल हवेत, याबाबत विचार व्हायला हवा. गणेशोत्सवासाठी मंजूर झालेल्या निधीची नोंदणी असलेल्या मंडळांना मदत होर्इल, असे नियोजन करणे आवश्यक आहे.

भाऊसाहेब करपे (सहकार तरुण मित्र मंडळ) : रस्ते बंद केल्याचा मोठा परिणाम मिरवणुकीवर होतो. त्यामुळे मंडळांचे म्हणणे विचारात घेऊन त्याबाबतचे नियोजन करावे. तसेच महत्त्वाच्या गणेश मंडळांच्या मिरवणुका दुपारी चारच्या आता संपवाव्यात. तसे झाल्यास मिरवणूक लवकर संपेल आणि पोलिसांना नियोजन करणे सोपे होर्इल. उत्सवकाळात नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.

राजेंद्र शिंदे (महाराष्ट्र तरुण मित्र मंडळ) : गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या उत्सवातील परंपरा नाहीशी होत चालली आहे. त्यात योग्य ते बदल करणे आवश्यक आहे. मानाचे आणि त्यानंतर काही मोठ्या मंडळांची मिरवणूक लवकर निघाल्यास इतर मंडळांना उशीर होत आहे. मिरवणुकीमध्ये कोणताही वाद होणार नाही, याची काळजी घेत उत्सव निर्विघ्न पार पाडावा.

कौस्तुभ खाकुर्डीकर (माती गणपती) : गणेशोत्सव आता केवळ पुण्यापुरता मर्यादित राहिला नसून, त्याची व्याप्ती जगभर पसरली आहे. या उत्सवाचे १० दिवसांचे सर्व नियोजन केले पाहिजे. तसे केल्यास मिरवणुकीवेळी कोणताही गोंधळ होणार नाही, याबाबत प्रमुख मंडळांनी योग्य तो निर्णय घ्यावा.

मनीष साळुंखे (श्री बाळ मित्र तरुण मंडळ) : मिरवणुकीचा मार्ग हा सुरळीत असावा. शहराच्या सर्व भागातील मंडळांना समान संधी मिळावी. गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपली सांस्कृतिक ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्रित येऊन मोठ्या आनंदात हा उत्सव साजरा करावा, अशी अपेक्षा आहे.

गणेश भोकरे (मुठेश्वर मंडळ, शनिवार पेठ) : मिरवणुकीत कोणते मंडळ, कोणत्या रस्त्यावर असेल याबाबत नियोजन आहे. त्यामुळे दरवर्षी मंडळे जशी सोडली जात आहेत, तशीच ती सोडावी. कोणतेही मंडळ मध्ये आले तर त्यांना प्रवेश दिला जाऊ नये. ज्या मंडळांचा विद्युत रोषणार्इचा देखावा आहे, त्यांना रात्रीच्या वेळी रस्त्यावर सोडावे. त्यांना दिवसा प्रवेश दिला तर त्यांनी केलेल्या देखाव्याचा काहीच उपयोग होणार नाही.

सुभाष थोरवे (शाहू चौक मंडळ) : सध्या अनेक मंडळांनी त्यांच्या मांडवाचे काम सुरू केले आहे. जड वाहन आल्यास त्यांना काम बंद करावे लागते. त्यामुळे गणेशोत्सवात शहरात जड वाहनांना बंदी घालावी. आवश्यक आहे ती झाडे तोडावीत. तसेच सध्या विविध गाण्यांच्या ठेक्यावर तरुणार्इ मिरवणुकीत नाचण्याचा आनंद घेते. त्याऐवजी जुनी गाणी लावण्यात यावीत.

शैलेश बढाई (पुणे बढाई समाज ट्रस्ट) : विसर्जन मिरवणुकीत अनेक प्रकारची मंडळे असतात. त्यातील बिगर रोषणाई असलेली मंडळे लवकर बाहेर पडले पाहिजे. याबाबत पोलिसांना काही सुचवले तर ते मंडळांना मागे पाठवतात. असे न करता मिरवणुकीत समन्वय असायला हवा. जे मंडळ पहिले येईल, त्याला पुढे जाऊ द्यावे. विसर्जन मिरवणूक लांबू नये. एक मंडळ- एक पथक असावे व पथकांना वादनासाठी ठराविक वेळ द्यावा.

प्रवीण चोरबेले (माजी नगरसेवक) : गणेशोत्सवकाळात आपण सर्व एकत्र असतो. मात्र, काही मुद्यांवर आपल्यात समन्वय बिघडला आहे. त्यातून मिरवणुकीचा दर्जा खाली आला आहे. याचा गांभीर्याने
विचार करावा. काही मंडळे असे आहेत, जे वर्षभर चांगले काम करतात. त्यांना योग्य तो सन्मान मिळाला पाहिजे. तसेच टिळक रस्त्यावरील विसर्जन मिरवणूक नियंत्रित असावी.

प्रताप सांडगे : गणेशोत्सवात काही मंडळाचे अध्यक्ष किंवा कार्यकर्ते यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्या एक गुन्ह्यांमुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे मंडळाचा अध्यक्ष होण्यासाठी कोणी सहजासहजी तयार होत नाही, अशी परिस्थिती आहे. उत्सव काळातील वाहतूक कोंडी दूर केली जावी. उत्सवासाठी आवश्यक निर्णय सर्वांनी एकत्र येऊन घ्यावेत.


--

मनीषा धारणे (सुभाषनगर माडीवाले वसाहत गणेशोत्सव मंडळ)
टिळक रस्त्यावरील मिरवणुकीचा बंदोबस्त करण्यासाठी स्थानिक वरिष्ठ पोलिस अधिकारी यांची नेमणूक करावी. या रस्त्यावर मुख्य मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी दोनच चौक ठेवावे. चौक वाढविल्यास आणखी गोंधळ होऊ शकतो. दोन्ही बाजूचा एक-एक असे गणपती जर पोलिसांनी सोडले तर मिरवणुकीचे नियोजन नीट होईल आणि पुढे जाण्यावरून दोन मंडळांमध्ये वाद होणार नाहीत. महिला भक्तांसाठी स्वच्छता गृह आणि डॉक्टर उपलब्ध असावेत.

संजय काळे (संगम तरुण मंडळ ट्रस्ट)
गणेशोत्सव मंडळ व त्यातील कार्यकर्त्यांना गणेशोत्सवापुरते न ठेवता वर्षातून किमान चार बैठका मंडळांसोबत घेतल्या पाहिजेत. गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या विचारांची सूचनांची देवाण-घेवाण सातत्याने ठेवली गेली पाहिजे. दरवर्षीप्रमाणे कोथरूडमधील रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्या झाडाच्या फांद्या मिरवणुकीला मंडपाला अडसर ठरतात. त्याबाबत आम्ही पुणे महानगरपालिकेला त्या फांद्या त्वरित काढून घेण्यासाठी निवेदन दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झोपलेले गृहमंत्री जागे होतील अशी अपेक्षा, रोहित पवारांनी व्यक्त केला संताप; मध्यरात्री ३ वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात

ENG vs IND: जो रुट भारतासाठी ठरलाय डोकेदुखी! ३९ वे कसोटी शतक ठोकत केलेत कोणालाच न जमलेले पराक्रम

Latest Marathi News Updates Live : भागलपूरमध्ये पिक-अप व्हॅनचा अपघात, पाच तरुण ठार

John Abraham: जॉन अब्राहम गुप्तहेराच्या वेगळ्या रूपात झळकणार; ‘तेहरान’ लवकरच ओटीटीवर

धक्कादायक! 'साेलापुरमध्ये तरुणाने व्हिडिओ पाठवून जीवन संपवले'; दोनच महिन्यापूर्वी विवाह, भलतचं कारण आलं समाेर..

SCROLL FOR NEXT