पुणे

आज रंगणार ‘दो किशोर’ मैफील

CD

पुणे, ता. ३ : आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजाने आणि अष्टपैलू गायकीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविलेल्या किशोर कुमार यांच्या ९६ व्या जन्मदिनानिमित्त ‘दो किशोर’ ही विशेष संगीत मैफील सोमवारी (ता. ४) रंगणार आहे. जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम सादर होणार आहे.

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि.’ आणि ‘कोहिनूर ग्रुप-अ कृष्णकुमार गोयल एंटरप्राइज’ हे या कार्यक्रमाचे सहयोगी प्रायोजक आहेत.

या मैफिलीत किशोर कुमार यांच्या अजरामर गीतांची मेजवानी पुणेकरांना अनुभवायला मिळेल. यात ‘कोरा कागज था ये मन मेरा’, ‘रूप तेरा मस्ताना’, ‘ये रातें ये मौसम’, ‘जिंदगी एक सफर है सुहाना’, ‘एक चतुर नार’, ‘मेरे सामने वाली खिडकी में’, ‘तेरे मेरे मिलन की ये रैना’, ‘गाता रहे मेरा दिल’ यांसारख्या अनेक लोकप्रिय गीतांचा समावेश असेल.

गायक जितेंद्र भुरूक आणि मकरंद पाटणकर आपल्या सहकाऱ्यांसह ही मैफील सादर करतील. यात सहगायिका म्हणून कोमल कृष्णा सहभागी होणार असून, केदार परांजपे, मिहीर भडकमकर, मुकेश देढिया, लिजेस शशिधरन, बाबा खान, प्रसाद गोंदकर, सचिन वाघमारे, अजय अत्रे, नितीन शिंदे, सोमनाथ फाटके, सुनील साळवी, अभिषेक भुरूक हे वादक असतील. जी. महेश हे निवेदन करणार आहेत. या कार्यक्रमाची तिकिटे bookmyshow.com वर तसेच बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी नऊ ते ११.३० या वेळेत उपलब्ध आहेत.

‘दो किशोर’ संगीत मैफील
कधी : सोमवार (ता. ४)
केव्हा : सायंकाळी ६:३० वाजता
कुठे : बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंची आमदारकी ४ महिन्यांत जाणार... जवळच्या व्यक्तीचा खळबळजनक दावा

IND vs PAK, Asia Cup: सूर्यकुमारने जिंकला टॉस, प्लेइंग-११ मध्ये बदल; दोन्ही कर्णधारांमध्ये हस्तांदोलन झालं?

Formula 1 Updates : कोण ठरला F1 रेसचा आजचा विजेता? सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व काही जाणून घ्या, एका क्लिकवर

inspiring Women Story: 'लग्नानंतर २३ वर्षांनी पदव्युत्तर पदवी; माधुरी नवले यांनी पटकाविले सुवर्ण'; कौटुंबिक जबाबदारी सांभाळत केला अभ्यास

Kunbi Note: 'साेलापूर जिल्ह्यात कुणबी नोंद असूनही वंशावळ सिद्ध करणे कठीण'; गाव, आडनाव जुळले तरी जुन्या कागदपत्रांअभावी मिळेना जात प्रमाणपत्र

SCROLL FOR NEXT