पुणे

विक्री व्यवस्थापन अन् व्यवसाय विकास कौशल्य

CD

पुणे, ता. ३ : प्रत्येक कंपनी अथवा उद्योगांमध्ये उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ‘विक्री’ हा एक मूलभूत घटक आहे. कंपनीचे मुख्य उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विक्री प्रशिक्षण आवश्यक आणि खूप महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर विक्री यशस्वी करण्यासाठीचे सर्वसमावेशक विक्री व व्यवसाय विकास प्रशिक्षण १० ऑगस्टला आयोजिले आहे. या प्रशिक्षणाद्वारे परिणामकारक विक्री कशी करावी व विक्रीचे उद्दिष्ट कसे साध्य करावे याबाबत प्रात्यक्षिक सराव सत्रांसह मार्गदर्शन होणार आहे. यामध्ये विक्रीपूर्व नियोजन, विक्रीची मूलभूत तत्त्वे, संभाषण कौशल्य, ऐकण्याचे कौशल्य, नोट्स कशा घ्याव्यात, बँकेसोबतचे व सरकारी संस्थेसोबतचे व्यवहार कसे हाताळावे, टेलीकॉलिंगवर बोलण्याची पद्धत, वाटाघाटी कशा कराव्यात, डेटा मॅनेजमेंट यांसह व्यावसायिक विक्री कौशल्ये शिकवली जाणार आहेत.
संपर्क : ८४८४८११५४४

शासकीय ई-निविदा प्रक्रिया प्रशिक्षण
विविध शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक विश्वस्त संस्था, देवस्थाने आता ई-निविदा प्रक्रिया राबवत आहेत. याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणारे १० दिवस चालणारे ऑनलाइन प्रशिक्षण ११ ऑगस्टपासून सुरु होत आहे. यात विविध विभागातील नोंदणी, न दिसणाऱ्या निविदा कशा शोधायच्या, बीओक्यू भरताना येणाऱ्या अडचणी, कागदपत्रे, डिजिटली सही, ईएमडी व एसडीमध्ये सूट कशी मिळवायची, स्वतःकडे यंत्रे व साहित्य नसतील तर करावयाचे भाडेकरार, निविदापूर्व बैठकीला जाण्यापूर्वी करावयाच्या १५ महत्त्वपूर्ण गोष्टी कोणत्या याबाबत तसेच इतर महत्त्वाच्या तांत्रिक गोष्टींबद्दल मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७

मुलांसाठी थ्री-डी प्रिंटिंग तंत्रज्ञान
मुलांच्या कलात्मक क्षमतेला नवीन आयाम देण्यासाठी १६ व १७ ऑगस्टला थ्री-डी प्रिंटिंग तंत्रज्ञान कार्यशाळा आयोजिली आहे. कार्यशाळेत मुलांना थ्री-डी प्रिंटिंगची मूलतत्त्वे, एफडीएम प्रिंटरची कामे आणि सुरक्षित वापर याची ओळख, डिजिटल मॉडेल डिझाइन करणे, टॅग, बबल वँड, लिथोफेन चित्र यांसारखी मूळ वस्तू तयार करून स्वतःची मुद्रित वस्तू घेऊन जाण्याची मजा, प्रिंटिंग नियोजन, सलाईसिंग, ट्रबलशूटिंग व पोस्ट-प्रोसेसिंगची कौशल्ये आदी बाबींची मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत प्रात्यक्षिकांसहीत माहिती दिली जाणार आहे. ही कार्यशाळा इंटरॅक्टिव्ह असणार आहे. प्रत्येक सहभागी व्यक्तीस प्रिंट केलेले मॉडेल मिळणार आहे. कार्यशाळा ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी योग्य आहे. मुलांमध्ये तंत्रज्ञान, डिझाईन, शैक्षणिक व वैज्ञानिक आवड विकसित करणे हा या कार्यशाळेचा उद्देश आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

ब्यूटी इंडस्ट्रीतील नवीन करिअर
कोरियन ग्लास स्किन टेक्निकद्वारे पारंपरिक पद्धतींना मागे टाकत, ब्युटी व्यवसायाला एक नव्या उंचीवर नेण्याची संधी आहे. कोरियन स्किन ट्रीटमेंट जगभरात ख्यातीस पावलेली आहे. याबाबत मार्गदर्शन करणारा सेमिनार २० ऑगस्टला आयोजिला आहे. यामध्ये कोरियन स्किन ट्रीटमेंटची मूलतत्त्वे आणि कार्यपद्धती, ग्राहकांसाठी योग्य ट्रीटमेंट डिझाईन कशी करावी, स्किन कन्सल्टेशन, स्किन मॅपिंग आणि पोस्ट-ट्रीटमेंट मार्गदर्शन, व्यावसायिक पॅकेजेस कसे तयार करायचे आणि विकायचे याबाबत प्रात्यक्षिकांसह सखोल माहिती दिली जाणार आहे. सलून मालक, ब्युटीशियन, मेकअप आर्टिस्ट किंवा एस्थेटिशियन यांच्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: सनातनी धर्माने भारताचे वाटोळे केले, शरद पवार गटाच्या आमदाराची वादग्रस्त टिप्पणी

Bhide Guruji: वारकरी संप्रदायाचा वारसा जपावा: भिडे गुरुजी; आमदार जगताप यांची सदिच्छा भेट

Sangli Crime: वाळवा तालुका हादरला! 'कुंडलवाडीत मामाकडून भाच्याचा खून'; जुन्या वादातून घटना, चाकू छातीत घुपसला अन्..

ENG vs IND 5th Test: सिराजने सीमारेषा ओलांडली; हॅरी ब्रूकने शतकी खेळी केली; एक चूक जी भारताला कायमची लक्षात राहिल

Prithviraj Chavan: हिंदुत्ववादी म्हणजे दहशतवाद, माजी मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य; युवा सेना आक्रमक

SCROLL FOR NEXT