पुणे

पुणे शहर भोंगेमुक्तीसाठी पाठपुरावा ः किरीट सोमय्या

CD

पुणे, ता. ३ : ‘‘मशिदीवरील भोंग्यामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. या अनुषंगाने मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी शहर भोंगेमुक्त करून दाखविले. पुणे पोलिस आयुक्तांनीही ते करून दाखवावे. पुणे शहर भोंगेमुक्त करण्याबाबत आपण आजपासून पाठपुरावा करणार आहोत,’’ अशी माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली.
किरीट सोमय्या यांनी रविवारी (ता. ३) फरासखाना आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यात संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सोमय्या म्हणाले, ‘‘उच्च न्यायालयाने जानेवारी २०२५ मध्ये मशिदीवरील अनधिकृत भोंग्यामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबाबत आदेश दिला आहे. या आदेशात ध्वनी मर्यादा ५० डेसिबलपेक्षा अधिक असू नये, असे म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अनधिकृत भोंगे चालणार नाहीत, अशी घोषणा विधानसभेत केली आहे. अनधिकृत भोंग्यांमुळे ध्वनी प्रदूषण होत असून, छत्रपती संभाजीनगर आणि ठाणे शहरात ६० ते ७० टक्के भोंगे काढण्यात आले आहेत.
‘‘पुणे पोलिस आयुक्तांसह सर्व पोलिस ठाण्यांना उच्च न्यायालयाच्या आदेशाची कागदपत्रे पाठवली आहेत. मशिदीवरील भोंगे किंवा कोणताही उत्सव असो, ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाचे पालन झाले पाहिजे. परंतु काही पोलिस अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जात नाही,’’ असे त्यांनी नमूद केले. मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. मग या स्फोटामागील नेमके आरोपी कोण, या प्रश्नावर सोमय्या म्हणाले, ‘‘याबाबत राज्य सरकार योग्य निर्णय घेईल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT