पुणे

हडपसर स्थानकावरून रेवा एक्स्प्रेस सुटणार पुणे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी निर्णय

CD

पुणे, ता. ३ ः हडपसर टर्मिनलवर नॉन इंटरलॉकिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने हडपसर स्थानकावरून रेल्वे गाड्यांची वाहतूक वाढविण्यास सुरुवात केली आहे. रविवारी रेवा- पुणे एक्स्प्रेसचे उद्‌घाटन रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांच्या हस्ते झाले. रविवारी ही रेल्वे रेवाहून निघाली. ती पुण्याला येणार होती, मात्र रेल्वे प्रशासनाने ही रेल्वे हडपसर स्थानकापर्यंतच धावेल, असा निर्णय घेतला आहे. या रेल्वेचे अंतिम स्थानक पुणे होते, ते बदलून हडपसर करण्यात आले. यामुळे पुणे स्थानकावरचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
हडपसर रेल्वे स्थानकावर नुकतेच नॉन-इंटरलॉकिंगचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले. त्यामुळे नवीन सुरू होणाऱ्या रेल्वे गाड्यांची सेवा आता पुण्याऐवजी हडपसर स्थानक असणार आहे. याची सुरुवात रेवा एक्स्प्रेसनी झाली आहे. हळूहळू अन्य रेल्वे गाड्यादेखील हडपसर स्थानकावरूनच सुटतील आणि हडपसर स्थानकावरच आपल्या प्रवासाचा शेवट करणार आहेत.
-------------
याचा फायदा काय :
- या बदलामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील फलाटांची उपलब्धता वाढणार आहे.
- पुणे स्थानकावरचा ताण कमी होण्यास मदत मिळेल.
- हडपसर स्थानकाच्या परिसराचा विकास होईल.
- प्रवासी सुविधा वाढण्यास मदत.
- फलाटाअभावी होम सिग्नलवर गाड्यांना थांबावे लागणार नाही.
- प्रवाशांच्या वेळेत बचत होण्यास मदत.
---------------------
‘‘रेवा एक्स्प्रेस आता पुण्याऐवजी हडपसर स्थानकावरच टर्मिनेट होणार आहे. यामुळे पुणे स्थानकावरचा ताण कमी होण्यास मदत मिळेल. हळूहळू हडपसर टर्मिनलहून रेल्वे गाड्यांची वाहतूक वाढणार आहे.
पद्मसिंह जाधव, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झोपलेले गृहमंत्री जागे होतील अशी अपेक्षा, रोहित पवारांनी व्यक्त केला संताप; मध्यरात्री ३ वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात

ENG vs IND: जो रुट भारतासाठी ठरलाय डोकेदुखी! ३९ वे कसोटी शतक ठोकत केलेत कोणालाच न जमलेले पराक्रम

Mahadevi Elephant : माधुरी हत्तीण कोल्हापूरला परत मिळणार का? कोणत्या कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागणार? वाचा...

धक्कादायक! 'साेलापुरमध्ये तरुणाने व्हिडिओ पाठवून जीवन संपवले'; दोनच महिन्यापूर्वी विवाह, भलतचं कारण आलं समाेर..

पुणे पोलिसांकडून तरुणींना मारहाण, शिवीगाळ; गुन्हा नोंदवता येणार नाही, पोलिसांचं पत्र

SCROLL FOR NEXT