पुणे

आयुर्वेदिक औषधाने टळली शस्त्रक्रिया

CD

पुणे, ता. १३ : ‘लिव्हर सिरोसिस’ व ‘पॅनक्रियाटायटीस’ झालेल्या ५५ वर्षांच्‍या रुग्णाला शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला होता. परंतु आयुर्वेदिक औषधांच्या उपचारामुळे शस्त्रक्रिया टळण्यास मदत झाली आहे. याबाबतचा वैद्य मल्हार नेसरी यांचा शोध निबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.

युरोप मध्ये प्रकाशित होणारे ‘साउथ ईस्टर्न युरोपियन जर्नल ऑफ पब्लिक हेल्थ’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात (संशोधन पत्रिका) याविषयीचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्‍या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी या ५५ वर्षीय रुग्णाला दीर्घ मद्यपानाचा इतिहास होता. त्‍याला यकृताच्या विकारामुळे कावीळ झाली होती. त्‍याला दोन महिन्‍यांसाठी आयुर्वेदिक औषधे दिली व रुग्णाला पथ्य पाळायला सांगितले. यामुळे त्‍याच्‍या लक्षणांमध्ये सुधारणा झाली होती. दरम्‍यान मद्यपान सूरू केल्‍यावर त्‍‍याने त्‍याला ‘लिव्हर सिरोसिस’ (यकृताचा गंभीर आजार, यकृताच्‍या निरोगी पेशींच्या जागी चट्टे तयार होणे) व ‘पॅनक्रियाटायटीस’ (स्वादुपिंडाला सूज येणे) हा आजार उद्‌भवला. पोटात पाणी जमा व्‍हायचे. रुग्णालयात दाखल करून काही तपासण्या केल्यानंतर त्‍यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला होता.

विना शस्त्रक्रिया यावर काही उपचार करता येईल का, या शोधात रुग्णाने कोथरूडमधील मेधामृत आयुर्वेद चिकित्सालयास भेट दिली व तिथेच उपचार सुरू करण्याचा निर्णय घेतला. या क्लिनिकमध्ये वैद्य मल्हार नेसरी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी उपचार घेतले. दीड ते दोन महिन्यांच्या उपचारामुळे त्‍याची लक्षणे सुधारली व शस्त्रक्रिया पूर्णपणे टळली असल्‍याचे निदर्शनास आले, अशी माहिती वैद्य मल्‍हार नेसरी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

"खरे हिरो बाबाच!" शिवम दुबेने T20 World Cup चे मेडल घातलं वडिलांच्या गळ्यात; पाहा Video

ठरलं! या दिवशी भेटीला येतेय 'मोहिनी'; कलर्स मराठीवर 'ही' गाजलेली मालिका होणार बंद? प्रेक्षक नाराज

Latest Marathi News Live Update : ठाण्यात अपघाताचा थरार, कार डिव्हायडरला धडकली

Billionaires: वयाच्या 22 व्या वर्षीच भारतीय पठ्ठाने मोडला मार्क झुकरबर्गचा विक्रम! बनला जगातील सर्वात तरुण सेल्फ-मेड अब्जाधीश

SCROLL FOR NEXT