पुणे

पीएमपीची ‘थांबा पाटी’ मोहीम

CD

पुणे, ता. १३ : अनेकदा प्रवाशांना पीएमपी बसचा थांबा कुठे आहे हेच माहीत नसते. त्यामुळे प्रवासी एकीकडे तर बस थांबते दुसरीकडे. परिणामी प्रवाशांची गैरसोय होते शिवाय पीएमपीचे प्रवासी देखील कमी होतात. या विषयी तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आता प्रशासनाकडून थांबा असलेल्या ठिकाणी ‘थांबा पाटी’ लावण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. परिणामी प्रवाशांना ‘थांबा’ कुठे आहे याची माहिती होईल.

अनेकदा रस्त्याची कामे करताना पीएमपीने बस थांब्याची लावलेली पाटी काढली जाते. काही ठिकाणी ती पुन्हा लावली जाते तर काही ठिकाणी लावायचे राहून जाते. त्यामुळे प्रवाशांना बस कुठे थांबणार आहे, याची माहिती मिळतच नाही. नेहमीच्या प्रवाशांना जरी बसचा ‘थांबा’ माहीत असला तरी नवीन प्रवाशांची मात्र अडचण होते. ते जिथे थांबतात, त्याच्या दूरच बस थांबते. यातूनच प्रवाशांची धावपळ होते. हे सर्व टाळण्यासाठी ‘थांबा पाटी’ लावण्यात येणार आहे. यासाठी एका बसमधून संबंधित विभागाचे कर्मचारी शहरातील विविध भागांत फिरून पाटी आहे की नाही, याचे सर्वेक्षण करतील. त्यानंतर जिथे पाटी नाही, तिथे पाटी बसविण्याचे काम सुरू होईल.

पाटीवर असेल बसमार्ग
ज्या ठिकाणी बसच्या थांब्याला शेल्टर आहे. तिथे पाटीची आवश्यकता नाही. मात्र ज्या ठिकाणी शेल्टर नाही. तिथे ही पाटी लावली जाईल. त्यावर त्या रस्त्याशी जोडलेले मार्गांचे क्रमांक लिहिले जातील. त्यावरून प्रवाशांना कोणत्या मार्गाची बस येथे थांबेल याची माहिती मिळणार आहे.

पिवळ्या रंगातील ‘थांबा पाटी’ लावण्यात येणार आहे. त्यावर बस मार्ग क्रमांकाचा उल्लेख असणार आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार असून, लवकरच पाटी बसविण्याचे काम सुरू होईल.
- निरंजन तुळपुळे, विभागीय अभियंता, पीएमपीएमएल, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उमरासाठी जायचंय! दोनदा विमान रद्द झालं, पण आज जाणारच; तरुणाचा VIDEO व्हायरल

Yermala Crime : चोराखळी येथे कालिका सांस्कृतिक कलाकेंद्र चालकाच्या घरी सशस्त्र दरोडा; पिस्तूल–सुरे दाखवून ९.५१ लाखांचा मुद्देमाल लंपास

Crime News : तरूणपणी केला गुन्हा, म्हातारपणी झाली अटक; पोलिसांच्या जाळ्यात ३० वर्षांनतर असा अडकला फरार आरोपी

Nashik Municipal Budget : नाशिक मनपाचे ३०११ कोटींचे 'सिंहस्थ' बजेट सादर; करवाढ नाही, पण जाहिरात महागली!

Phulambri News : तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT