पुणे, ता. १३ : पुणेकरांना गेल्या काही दिवसांपासून भेडसावत असलेल्या उकाड्यापासून रविवारी (ता. १३) काहीसा दिलासा मिळाला. शहरातील कमाल आणि किमान तापमानात सरासरी दोन अंश सेल्सिअसने घट झाली असून, ढगाळ वातावरणामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.
पुणे आणि परिसरात दिवसभर आकाशामध्ये ढगांची सतत वर्दळ होती. काही वेळा सूर्य ढगांच्या आड लपला होता. त्यामुळे दिवसभर हवामानात एक प्रकारची दमट आणि गडद छाया जाणवत होती. रविवारी शहरात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. गेल्या दोन दिवसांत तापमानात झालेली ही घसरण पुणेकरांसाठी सुखद ठरली. विशेषतः सकाळी आणि रात्रीच्या वेळेस हवेत जाणवणारा गारवा उकाड्यापासून दिलासा देणारा ठरला. पुढील दोन ते तीन दिवस पुणे शहरात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत तापमानात थोडीशी वाढ होऊ शकते, परंतु त्यानंतर पुन्हा कमाल तापमानात घट होऊन हवामान स्थिर राहण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
पुणे आणि परिसरात सोमवारी (ता. १४) कमाल तापमानात किंचित वाढ होणार असून, कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस इतके नोंदविले जाईल, तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस नोंदवले जाईल. आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी आणि सायंकाळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे, तर मंगळवारी (ता. १५) कमाल तापमान स्थिर राहणार असून, त्यानंतर दोन दिवसांनी गुरुवारी (ता. १७) कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस नोंदविले जाण्याची शक्यता आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.