पुणे, ता. १५ : जय गणेश रुग्णसेवा अभियान अंतर्गत ‘आरोग्य गणेशा’मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (ता.२०) सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळात बाजीराव रस्त्यावरील नूमवि हायस्कूलमध्ये हे शिबिर घेण्यात येणार आहे.
शिबिरात मोफत चाचण्या आणि उपचार होणार आहेत. हृदयाचे आजार, विविध थेरपी, अस्थिरोग उपचार, रेडीओलॉजी विभाग, रक्ताच्या तपासण्या, अपंगांना कृत्रिम हात-पाय वाटप, लहान मुलांचे आजार, स्त्रीरोगांवरील तपासण्या, दंत उपचार, नेत्र तपासणी, कॅन्सरवरील चाचण्या व उपचार होणार आहेत. त्यासोबतच मोफत आयुष्यमान भारत योजना कार्ड आणि सर्वसाधारण औषधोपचाराच्या सुविधा देण्यात येतील, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र परांजपे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस, आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, पदाधिकारी यतीश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर आदी उपस्थित होते.
----------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.