पुणे, ता. १८ : भरधाव ट्रकची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. १६) रात्री साडेअकरा वाजता नगर रस्त्यावर घडली.
महेश मनोहर चव्हाण (वय २८, रा. साजूर, कराड, जि. सातारा) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नीलेश सुर्वे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार चव्हाण हे बुधवारी रात्री साडेअकरा वाजता दुचाकीवरून नगर रस्त्याने जात होते. खराडी बाह्यवळण मार्ग चौकात भरधाव ट्रकने चव्हाण यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने चव्हाण यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र ढावरे करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.