पुणे

चित्रप्रदर्शनातून उलगडणार ‘वंदे मातरम्’चा इतिहास

CD

पुणे, ता. ४ ः ‘वंदे मातरम्’‌‍ या गीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त आणि बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या १३१व्या स्मृतीदिनानिमित्त ‘ऋषी बंकिमचंद्र स्मृती महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवांतर्गत ‘वंदे मातरम्’‌‍चा इतिहास मांडणाऱ्या तसेच नामवंत भारतीय चित्रकारांनी रेखाटलेल्या भारतमातेच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
हे प्रदर्शन मंगळवार (ता. ८) ते शनिवार (ता. १२) या कालावधीत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत बालगंधर्व कलादालनात सर्वांसाठी खुले असेल, अशी माहिती प्रदर्शनाचे संयोजक मकरंद केळकर आणि ‘वंदे मारतम्’‌‍चे अभ्यासक मिलिंद सबनीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी रवींद्र सातपुते उपस्थित होते.
प्रदर्शनाचे उद्‍घाटन मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ चित्रकार चंद्रशेखर जोशी, अनिल उपळेकर यावेळी उपस्थित असतील. या प्रदर्शनात रावबहादूर धुरंधर, दीनानाथ दलाल, रघुवीर मुळगावकर, अल्लाबक्ष, पं. श्रीपाद सातवळेकर, अवनींद्रनाथ ठाकूर, वासुदेव कामत, सुहास बहुळकर यांच्या मुद्रित चित्रांसह जि. भी. दीक्षित, अनिल उपळेकर, सचिन जोशी, गिरीश सहस्रबुद्धे, चंद्रशेखर जोशी यांची मूळ चित्रेही प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जय शिवराय! 'या' सिनेमागृहात 'राजा शिवाजी' सिनेमा मोफत पाहता येणार, पहा संपूर्ण यादी

HSC result 2026 Maharashtra : बारावीचा निकाल 2 मे रोजी, 'या' लिंकवर निकाल पाहता येणार

Sunetra Pawar Banner in Pandharpur : 'माझा विठ्ठल...!' देवघरात अजितदादांची प्रतिमा, आता पंढरपूरच्या वेशीवर सुनेत्रा पवारांसाठी 'तो' बॅनर चर्चेत!

Mumbai Pune Expressway Traffic : वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांकडून टोल घेऊ नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचना

Who is Arshad Khan? मुंबई इंडियन्सने पहिली संधी दिली अन् तो आता गुजरात टायटन्ससाठी ठरतोय एक्स फॅक्टर; RCB लाही दिलाय त्रास

SCROLL FOR NEXT