पुणे, ता. १० : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाच्या निमित्ताने धर्मादाय रुग्णालयांमधील गैरप्रकार समोर आले आहेत. अनेक धर्मादाय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार नाकारल्याने रुग्णांचा जीव जात आहे. त्यामुळे अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी संपूर्ण राज्यभरातील धर्मादाय रुग्णालयांसाठी कडक नियमावली लागू करावी, अशी मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दूत संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश साकुंडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी संघटनेचे रमेश क्षीरसागर, सुनील पवार, बाळासाहेब मोडक, राज रजपूत आदी उपस्थित होते. साकुंडे म्हणाले, ‘‘धर्मादाय रुग्णालयांच्या प्रशासनावर धर्मादाय कार्यालयाचा वचक नसल्यामुळे अशा घटना घडत आहेत. हे टाळण्यासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेची चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.