पुणे

एमआयटी-एडीटी विद्यापीठाला ‘नॅक’कडून ‘अ’ दर्जा

CD

पुणे, ता. १० : लोणी काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाला (एमआयटी-एडीटी) ‘नॅक’कडून (नॅशनल असेसमेंट ॲण्ड ॲक्रेडेशन काउन्सिल) ‘अ’ दर्जा मिळाला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस. यांनी गुरुवारी (ता. १०) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
यावेळी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, डॉ. सुनीता कराड आदी उपस्थित होते. डॉ. राजेश एस. म्हणाले, ‘‘विद्यापीठाचे मूल्यांकन करण्यासाठी नॅक समितीने १० ते १२ फेब्रुवारी या काळात विद्यापीठाला भेट दिली. अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, पायाभूत सुविधा, गुणवत्ता, संशोधन व व्यावसायिक कृतिशीलता, विद्यार्थ्यांचे नोकरी व व्यवसायाचे प्रमाण, समाजातील वंचित घटकांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याचे प्रयत्न, अशा विविध निकषांवर आधारित मूल्यांकन करून समितीने विद्यापीठाला पाच वर्षांसाठी ‘अ’ दर्जा प्रदान केला.’’

क्यूएस विद्यापीठ क्रमवारीत मिळालेले मानांकन, ‘एनआयआरएफ’मध्ये मिळालेले मानांकन यासह आता ‘नॅक’ने दिलेला ‘अ’ दर्जा, या सर्व यशाने विद्यापीठाच्या नावलौकिकात मानाचा तुरा खोवला गेला आहे. ‘एमआयटी-एडीटी’ विद्यापीठाचे विद्यार्थी आज जगभर विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे बहरलेले कर्तृत्व हीच विद्यापीठाच्या कार्याची खरी पावती आहे.
- प्रा. डॉ. मंगेश कराड, कार्याध्यक्ष, एमआयटी-एडीटी विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Liquor Tragedy : धक्कादायक उलगडा! गावठी दारूचा एकच घोट कसा ठरतो मृत्यूचं कारण? आतली भयावह प्रक्रिया वाचा

Mukesh Ambani: 1 रुपयाही पगार नाही, तरी देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती! मुकेश अंबानींची कमाई नेमकी कशी होते?

RCB विरुद्ध घरच्या मैदानात फायनल! गुजरातचा प्लॅन काय, कसा खेळणार संघ? शुभमन गिलने केला खुलासा

मी सगळं सोडूनच गेलेलं... लग्नानंतर अभिनय करणार नव्हती मृणाल दुसानिस; बाळ झाल्यानंतर का बदलला निर्णय?

Latest Marathi Update Live: कांदा खरेदीत नवा पेच; परवान्याअभावी शेतकऱ्यांसमोर अडचणींचे सावट

SCROLL FOR NEXT