पुणे, ता. १० : शिवचरित्राची अलौकिक पराक्रमगाथा उलगडणाऱ्या ‘गोष्ट इथे संपत नाही’ या कार्यक्रमाचा तिसरा अध्याय शनिवारी (ता. १२) रंगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या ‘पुरंदरचा तह’ ही गोष्ट यावेळी उलगडणार आहे.
‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘गोष्ट इथे संपत नाही- शिवचरित्र’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील आठ महत्त्वाच्या अध्यायांवरील प्रयोग ५ ते २७ एप्रिल या कालावधीत प्रत्येक शनिवार-रविवारी सकाळी ९.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात सादर होणार आहेत. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक रांका ज्वेलर्स असून सहप्रायोजक ‘रावेतकर ग्रुप’ आहे. ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.’ हे ‘फायनान्स पार्टनर’ असून ‘द नेचर- मुकाईवाडी’, व्हीटीपी रिॲलिटी आणि ‘शिवसृष्टी थीम पार्क’ हे सहयोगी प्रायोजक आहेत.
आयटी क्षेत्रात काम करणारे सारंग भोईरकर व सारंग मांडके हे दोन तरुण हे आठही कार्यक्रम सादर करणार असून मराठ्यांच्या इतिहासातील एखादी घटना निवडत त्याचे प्रभावी सादरीकरण करीत ती प्रेक्षकांसमोर आणायची असे याचे स्वरूप आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवरायांच्या जीवनातील आठ महत्त्वाच्या अध्यायांचा इतिहास उलगडणार आहे.
तिकिटांविषयी...
‘गोष्ट इथे संपत नाही- शिवचरित्र’ हा उपक्रम सशुल्क असून यासाठी सीझन पास आणि प्रत्येक प्रयोगासाठीचे वैयक्तिक तिकीट उपलब्ध आहे.
कार्यक्रमाची तिकीटविक्री ‘बुक माय शो’ या संकेतस्थळावर सुरू असून बालगंधर्व रंगमंदिरातही तिकिटे उपलब्ध आहेत.
उपक्रमाचे वेळापत्रक
- शनिवार (ता. १२) : पुरंदरचा तह
- रविवार (ता. १३) : आग्य्राहून सुटका
- शनिवार (ता. १९) : मोहीम मांडली मोठी
- रविवार (ता. २०) : शिवराज्याभिषेक
- शनिवार (ता. २६) : दक्षिण दिग्विजय
- रविवार (ता. २७) : लढाई मराठी अस्तित्वाची
(वरील सर्व कार्यक्रम सकाळी ९.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात सादर होणार आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.