पुणे

परदेशात जखमी झालेल्यांना तातडीची सेवा

CD

पुणे, ता. २७ ः फुकेत आणि अंदमान निकोबार येथे पर्यटनासाठी गेलेल्या पुण्यातील दोन दाम्पत्यांना विशेष विमानसेवा देत पुण्यात उपचारांसाठी आणण्यात यश आले. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांमुळे दोघांनाही तातडीची सेवा मिळण्यास मदत झाली. दोन्ही दाम्पत्यांवर पुण्यातील खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.
एका प्रकरणात भोसरी येथे राहणारे शुभम फुगे (वय २७ वर्षे) आणि त्यांची पत्नी सिद्धी (वय २१ वर्षे) हे दाम्पत्य फुकेतमध्ये पर्यटनासाठी गेले होते. तिथे झोका खेळताना अपघात झाला. त्यात पती, पत्नी गंभीररीत्या जखमी झाले. फुकेतमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र हाड मोडल्याने दोघांना वेदना असह्य होत होत्या. व्यवस्थित उपचार न मिळाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यात आणण्यात आले. यासाठी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची मोठी मदत झाली. त्यांच्या प्रयत्नामुळे विमानात स्ट्रेचरची व्यवस्था करण्यात आली. डॉक्टरसह हवाई वाहतूक कंपन्यांपर्यंतच्या सर्व आवश्यक परवानग्या युद्धपातळीवर मिळविण्यात आल्या. विमानातील खुर्ची काढून त्याजागी स्ट्रेचरची व्यवस्था करण्यात आली.
दुसऱ्या प्रकरणात सिंहगड रस्ता येथील लोहपात्रे कुटुंबीय अंदमान निकोबार व पोर्ट ब्लेअर येथे फिरायला गेले होते. बुधवारी (ता. २६) सायंकाळी शोभना लोहपात्रे यांचा एका छोट्या बेटावर भीषण अपघात झाला. त्यांच्या दुचाकीला भरधाव वाहनाने उडवले. त्या बेटावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने रात्री उशिरा केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मदतीने त्यांना उपचारांसाठी वायुदलाच्या विशेष विमानाने पोर्ट ब्लेअर येथे आणण्यात आले. तेथून त्यांना एअर ऍम्ब्युलन्सने पुण्यात गुरुवारी रात्री ९ वाजता आणण्यात आले, यासाठी पुणे विमानतळ ते पूना हॉस्पिटल या मार्गावर ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला होता.

परदेशात गेल्यावर अनेकांना विविध अडचणी येतात. असे प्रकार समजल्यावर त्यावर तातडीने कार्यवाही करणे आवश्यक असते. गरजूंना मदत करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. सरकारचे सर्व विभाग संवेदनशीलपणे काम करतात. त्याचा फायदा निश्चितच गरजूंना होतो.
- मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक

पुणे विमानतळावर दाम्पत्य नऊ वाजून ५१ मिनिटांनी दाखल झाले. त्यांना केवळ १३ मिनिटांमध्ये म्हणजे दहा वाजून चार मिनिटांनी पूना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यासाठी ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार करण्यात आला. त्यात विमानतळ, येरवडा, शिवाजीनगर, डेक्कन, विश्रामबाग वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहतूक नियोजन केले. जेथे वाहतुकीसाठी साधारण ३० ते ४० मिनिटे लागतात, ते अंतर केवळ १३ मिनिटांत पार केले.
- अमोल झेंडे, पोलिस उपायुक्त, पुणे शहर वाहतूक शाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Mumbai Expressway Accident : सीएनजी लिक होऊन धावती कार पेटली; वैष्णोदेवी दर्शनाहून परतणाऱ्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

IPL 2026 : दोन मॅच, जिथे मुबंई इंडियन्सने माती खाल्ली! R Ashwin ने पोलखोल केली; म्हणाला, आता सर्व ६ सामने जिंकणे अशक्य

Latest Marathi News Live Update : राज्यभरात उष्माघाताच्या 115 रुग्णांची नोंद

CBSE Parenting Calendar 2026-27: मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नवा उपक्रम; सुजाण पालकत्वासाठी 'सीबीएसई'कडून पालकांसाठी मार्गदर्शक दिनदर्शिका जाहीर

Gold Rate Today: एप्रिलमध्ये सोनं स्थिर! आता महागणार का? खरेदीदारांनी काय करावं?

SCROLL FOR NEXT