पुणे

श्री सारदा मठ कार्यक्रम

CD

श्री सारदा मठातर्फे
युवती शिबिर संपन्न
पुणे, ता. ४ ः येथील श्री सारदा मठातर्फे नुकतेच महाविद्यालयांतील विविध शाखांच्या युवतींसाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते. युवतींनी ओंकार उच्चारण, उपनिषदातील मंत्र व नारायण सुक्त पठणाद्वारे मनःशांती अनुभवली. मठाच्या सरचिटणीस परमपूज्य अतंद्रप्राणा माताजी यांनी ध्यानवर्ग घेतला, तर श्रीमती श्रद्धा व्यास यांनी स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील अनेक रोचक प्रसंगांतून त्यांच्यातील अदम्य शक्तीमागील स्रोत उलगडून दाखवला.
मातीजींनी मानवतेच्या चांगुलपणावर विश्वास ठेवून मत्सर व संशयाला बाजूला ठेवत आत्मिक बल कसे वाढवावे, हे सांगितले. युवतींनी गटचर्चेद्वारे सोशल मीडियाची समस्या पार करण्यासाठी वेदांताचा कसा उपयोग होईल याच्या कल्पना मांडल्या. श्रीमती सुमेधाताई चिथडे यांनी आध्यात्मिक अधिष्ठानातून समस्यांवर कशी मात करावी, हे स्वअनुभवातून युवतींना सांगितले. त्यानंतर प्रशासकीय सेवेतील सुवर्ण बागल-जाधव व कॅप्टन पूजा झा या दोन तडफदार युवतींच्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Schedule: मुंबई इ़ंडियन्ससाठी 'हे' वेळापत्रक लकी ठरणार! २०१९ नंतर जुळून आलाय योगायोग, सहावी ट्रॉफी आपलीच

Tanaji Malusare : कोण आहेत नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज? आता कुठे असतात अन् कशी आहे परिस्थिती..पाहा शिवरायांच्या वीर मावळ्याची पिढी

Latest Marathi News Live Update : एकनाथ महाराज नाथषष्ठी सोहळ्याची सांगता

LPG Gas Shortage: ''घाबरु नका, अडीच दिवसांमध्ये गॅस मिळेल'', पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद

IPL 2026 Full Schedule : आयपीएलच्या पहिल्या २० सामन्यांत CSK, RCB, MI, PBKS, GT, LSG, RR, SRH, KKR, DC यांच्या वाट्याला किती सामने? संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT