पुणे

‘मधुमेहाच्या वाढत्‍या खर्चाने कुटुंबे गरिबीच्या खाईत’

CD

पुणे, ता. ७ : महाराष्ट्रात एकूण लोकसंख्‍येपैकी साडेआठ टक्‍के लोकसंख्या मधुमेहाने प्रभावित आहे. मधुमेहाच्या औषधांचे आणि उपकरणांचे दर झपाट्याने वाढत असल्‍याने महाराष्ट्रातील अनेक कुटुंबे यावरील वाढत्या आरोग्य खर्चामुळे गरिबीच्या खाईत ढकलले जात आहेत, अशी माहिती ‘ब्लू सर्कल डायबेटिस फाउंडेशन’च्‍या नूपुर ललवाणी व स्‍नेहल नंदगवळी यांनी दिली.
आरोग्य हा प्रत्येक मानवाचा मूलभूत अधिकार आहे. प्रत्येक व्यक्तीला परवडणाऱ्या आणि दर्जेदार आरोग्यसेवेचा कोणत्‍याही आर्थिक संकटाशिवाय लाभ मिळायला हवा. परंतु इन्शुलिन, औषधे, रक्‍तातील साखरेच्या पातळीची नोंद ठेवणारी उपकरणे आणि डॉक्टरांच्या भेटी यांसाठी होणारा खर्च अनेक कुटुंबांसाठी मोठे आर्थिक ओझे बनले आहे. त्‍यातच अत्यावश्यक मधुमेहाच्या औषधांचे आणि उपकरणांचे दर झपाट्याने वाढत आहेत. या किंमतवाढीचा फटका विशेषतः गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना बसला आहे. ज्यामुळे सतत रक्तातील साखर नियंत्रण करणे आर्थिकदृष्ट्या अवघड झाले आहे.
परिणामी, इन्शुलिन, औषधे आणि सेन्सरच्या वाढत्या किमतींमुळे अनियंत्रित मधुमेह होऊ शकतो. त्‍यामुळे हृदय, मूत्रपिंड, डोळे आणि इतर अवयवांवर परिणाम करू शकतो व परिणामी संपूर्ण राज्यावर मोठा आर्थिक आणि सामाजिक भार पडतो. यामुळे मधुमेह उपचार सर्वांसाठी सुलभ आणि परवडणारे बनवण्यासाठी ठोस उपाय शोधावेत व या औषधांच्‍या किमतींवर नियंत्रण आणायला हवे, अशी मागणी त्‍यांनी प्रसिध्‍दीपत्रकाद्वारे केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IDBI Bank Privatisation : आयडीबीआय बँक झाली पूर्णपणे खाजगी! ५२,८७८ कोटी रुपयांना ६०% हिस्सा कॅनेडियन कंपनीला विकण्यास मंजुरी

Pune News : पुणे जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांची संख्या आठवरून दहा; जुन्नर, आंबेगावचाही दुष्काळग्रस्त तालुक्यांत समावेश

Maharashtra Live News : दुष्काळ आणि नापिकीच्या विवंचनेतून चंद्रपुरात ३५ वर्षीय शेतकऱ्याने संपवले जीवन

Sugarcane Rate Agitation : ऊस दराचा भडका! ३१ तासांनंतर महामार्गावरील चक्काजाम मागे; केंद्रीय मंत्र्यांच्या घराकडे 'शेतकरी पदयात्रा' सुरू, साताऱ्यात 'काटा बंद'चा इशारा!

Sinhgad Fraud News : शंभर कोटींच्या बिनव्याजी कर्जाचे आमिष; जाधवर संस्थेची ८७.६१ लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार; नऱ्हे पोलिसांकडून तपास सुरू

SCROLL FOR NEXT