पुणे

समाजाने मदत केली तरच शेतकरी उभा राहील

CD

पुणे, ता. ८ ः मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले असून, पुढची अनेक वर्षे यातून शेतकरी सावरू शकणार नाही. शेतकरी आत्महत्येचे संकट अधिक गंभीर होत आहे. पत्रकारांमुळे सरकारला या महापुराचे गांभीर्य कळाले. ते शेतकऱ्यांना मदत करतीलच, शहरामध्ये विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च, खानावळीचा खर्च यांसह अन्य कारणांसाठी ११ लाखांची मदत करू. शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी समाजाची मदत आवश्‍यक आहे, असे मत अभिनेते प्रवीण तरडे यांनी व्यक्त केले.
महापुराच्या स्थितीत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना मन हेलावून टाकणाऱ्या प्रसंगांना सामोरे जावे लागले. या पार्श्‍वभूमीवर महापुराच्या वेदनांचे कथन करण्यासाठी पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे पत्रकार भवन येथे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ‘साम टीव्ही’चे सागर आव्हाड, आयबीएन नेटवर्क १८ चे विलास बडे, टाइम्स ऑफ इंडियाचे संदीप दिघे, टीव्ही ९ चे प्रदीप कापसे, लक्ष्मण जाधव यांनी अनुभवातून आलेले शेतकऱ्यांचे दुःख मांडले. पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले, खजिनदार दिलीप तायडे, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले, शिवार हेल्पलाइनचे विनायक होगाणा यावेळी उपस्थित होते.
लेले म्हणाले, ‘‘शहरातील नागरिकांनी शेतकऱ्यांच्या वेदनांशी नाते जोडणे आवश्‍यक आहे. कपडे, फटाके, फराळ यावर दिवाळीत खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी मदतीसाठी पुढे यावे.’’ सूत्रसंचालन आशिष देशमुख यांनी केले.

पत्रकारांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे
- एक इंच मातीचा थर तयार होण्यास ४०० वर्षे लागतात, पण शेती खरडून गेली आहे, मातीऐवजी शेतात दगड-गोटे आहेत
- महापुराचा फटका शेतमजूर, ज्यांची पक्की घरे नाहीत अशा मागासवर्गीय लोकांना बसला आहे
- या संकटामुळे ग्रामीण भागातून शहरामध्ये स्थलांतर करण्याचे प्रमाण वाढण्याचा धोका आहे
- सरकार १०० टक्के मदत करू शकणार नाही, त्यासाठी उद्योगपती, मोठ्या संस्थांनी मदत केली पाहिजे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanpur Mishri Bazaar blast : कानपूरच्या मिश्री बाजारात मशिदीजवळ भीषण धमाका; दोन स्कुटरमध्ये झालेल्या स्फोटात सहा जण गंभीर जखमी

Dilip Khedkar यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला! अपहरण, मारहाण आणि पुरावे नष्ट करण्याचे गंभीर आरोप

Professor Recruitment Issue : प्राध्यापक भरतीत राज्यातील उमेदवारांसोबत दुजाभाव; भरती प्रक्रियेतील शैक्षणिक अर्हतेसाठी दिले कमी गुण

Pune: पुणे पोलिसांना लायटर आणि पिस्तूलमधील फरक कळेना? हडपसर पोलिसांकडून कोथरूड पोलिसांचा ‘खोटारडेपणा’ उघड

Mumbai: पात्र झोपडीधारकांऐवजी मृतांना घरे वाटली; झोपु योजनेतील बेदायदेशीर सदनिका वाटपाची चौकशी करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

SCROLL FOR NEXT