पुणे

विद्युत सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य द्या : राजेंद्र पवार

CD

पुणे, ता. १ : ‘‘विद्युत अपघातात कर्मचारी किंवा कमावत्या व्यक्तींचा मृत्यू झाल्यास कधीही भरून न येणारे नुकसान होते. त्यामुळे महावितरणचे कर्मचारी तसेच नागरिकांनी विद्युत सुरक्षेबाबत कायम सतर्क राहावे. विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे,’’ असे आवाहन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी रविवारी केले.

महावितरणच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘विद्युत सुरक्षा सप्ताहा’निमित्त कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थी व नागरिकांसाठी ऑनलाइन खुल्या प्रश्नमंजूषा पोर्टलचे उद्‌घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंता सुनील काकडे यावेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे. कोणत्याही परिस्थितीत विद्युत अपघाताचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. विद्युत सुरक्षेबाबत नागरिकांना अवगत करावे. त्यासाठी सातत्याने स्थानिक उपक्रम राबवा व नागरिकांशी संवाद साधा.’’

खुल्या प्रश्नमंजूषेला राज्यातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. विद्युत सुरक्षेच्या ऑनलाइन प्रश्नमंजूषेत रविवारी सायंकाळपर्यंत ५४ हजार ६५९ कर्मचारी, शालेय विद्यार्थी व नागरिकांनी सहभाग घेतला असून त्यांनी ऑनलाइन प्रमाणपत्रही मिळवले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karj Mafi: लाखो शेतकऱ्यांना मोठा धक्का! कर्जमाफी योजनेत थेट अपात्र; सरकारच्या तिजोरीतील पाच हजार कोटींची बचत

Dharmendra Pradhan Resignation : "भाजप कार्यकर्त्यांना पदापेक्षा देश महत्त्वाचा...!" प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अमित शहा यांची प्रतिक्रिया

Uddhav Thackeray: 'तरुणांनी देशाला भयाच्या छायेतून बाहेर काढले'; उद्धव ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका

धक्कादायक! १५ लाख घेतले, काँट्रॅक्ट मिळवून देण्याचा शब्द फिरवला... भारताच्या माजी फिरकीपटूने एकाला गंडवले, FIR दाखल

Pune Weather News: चार दिवसांच्या संततधारेनंतर पुणेकरांना दिलासा; शहरात पावसाची विश्रांती, घाटमाथ्यावर 'रेड अलर्ट'

SCROLL FOR NEXT