पुणे

अॅपलची सुनावणी पुन्हा लांबणीवर

CD

नवी दिल्ली, १५ मे (पीटीआय) ः दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी भारतीय स्पर्धा आयोगाला (सीसीआय) अॅपलच्या प्रकरणात पुढील आदेश येईपर्यंत अंतिम आदेश देऊ नका, असे म्हटले आहे. अॅप स्टोअरवरील स्वतःच्या स्थानाचा गैरवापर केल्याचा आरोप अॅपलवर करण्यात आला होता. आता या प्रकरणी अंतिम सुनावणी ही पंधरा जुलै रोजी होईल. मुख्य न्यायाधीश डी. के. उपाध्याय आणि न्या. तेजस कारिया यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. स्पर्धा आयोग या प्रकरणाची कारवाई पुढे नेऊ शकतात त्यामुळे अॅपलने त्यांना पूर्ण सहकार्य करावे, असे निर्देश कोर्टाकडून देण्यात आले. न्यायालय हे ‘स्पर्धा कायदा- २००२’ मधील दुरुस्तीला आव्हान देणाऱ्या अॅपलच्या याचिकेवर सुनावणी घेत होते. या दुरुस्तीमुळे ‘सीसीआय’ला कंपनीच्या जागतिक उलाढालीच्या (ग्लोबल टर्नओव्हर) आधारावर दंड आकारता येऊ शकतो. अॅपलची बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, ‘‘सीसीआयने २१ मे रोजी या प्रकरणावर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. नियमाकाने १५ जुलै रोजी अंतिम आदेश दिल्यास ही याचिका निष्फळ ठरू शकते. काही महत्त्वपूर्ण बाबी आढळून आल्यानंतर आम्ही या प्रकरणात नोटीस जारी केली होती. एका महिन्याच्या काळात काय होईल? आम्ही तुमची कार्यवाही थांबवत नाही आहोत. आम्ही फक्त एवढेच सांगत आहोत की आदेश पारित करू नका अन्यथा गुंतागुंत निर्माण होईल,’’ असे न्यायालयाने नमूद केले. गेल्या वर्षी अॅपलने ही याचिका दाखल केली होती, ज्यात कंपनीच्या जागतिक उलाढालीच्या आधारावर दंड आकारण्याची परवानगी देणाऱ्या दुरुस्तीला आव्हान देण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT