पुणे

ओवेसी यांच्या निर्णयाला आमदाराचे आव्हान

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
हैदराबाद, ता.३१ ः ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’ (एमआयएम) आमदार मिर्झा रहमत बेग यांनी पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतरही विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. बेग यांनी पक्षाचे प्रमुख व खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या आदेशालाच बेग यांनी थेट आव्हान दिले असून, पक्षाच्या इतिहासात प्रथमच एखाद्या नेत्याने नेतृत्वाचा निर्णय मान्य करण्यास नकार दिला आहे.
स्थानिक पातळीवरील काही नेते आणि कार्यकर्त्यांकडून त्यांना छुपा पाठिंबा मिळत असल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर नुकताच एक वादग्रस्त व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर ओवेसी यांनी बेग यांची तातडीने पक्षातून हकालपट्टी केली. हैदराबादच्या अत्तापूर परिसरात काही स्थानिक तरुणांनी बेग यांना घेरून हा व्हिडिओ तयार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी मध्यरात्री तातडीने कारवाई करत त्यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व रद्द केले. मात्र, हकालपट्टीच्या निर्णयापूर्वीच बेग यांनी सायबर गुन्हे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ‘एआय’च्या माध्यमातून फेरफार केलेल्या व्हिडिओचा वापर करून एक अज्ञात टोळी माझ्याकडून भरभरक्कम रक्कम उकळण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

विरोधकांकडून चौकशीची मागणी
भाजपने या प्रकरणातील गंभीर आरोपांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस आणि ‘बीआरएसने’ही पक्षश्रेष्ठींच्या मौनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मध्यरात्री करण्यात आलेली हकालपट्टी ही वास्तविक तथ्ये दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Thackeray Pune Visit : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी हा फोटो नको’; अमित ठाकरेंनी पंतप्रधान मोदींचा फोटो काढायला लावला अन्...

New Rule: 1 सप्टेंबरपासून खिशावर मोठा परिणाम! LPG, दूध, ITRसह 5 नियम बदलणार; जाणून घ्या काय स्वस्त-महाग होणार

Aditi Tatkare: मंत्री आदिती तटकरेंच्या PROचा मृत्यू, शतपावलीला गेले अन् अचानक कोसळले

मराठमोळ्या अभिनेत्रीची हिंदी मालिकेत दमदार एंट्री; 'झी मराठी'च्या या सिरीयलचा आहे हिंदी रिमेक; फोटो पाहून ओळखू शकाल?

Marathi News Live Updates : पंतप्रधान मोदींचा फोटो काढल्याप्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला पाहिजे - नवनाथ बन

SCROLL FOR NEXT