पुणे

-

CD

१- बैठकींद्वारे भात उत्पादकांच्या अडचणी दूर केल्या जातात.
२- सुळकुड येथील कलगोंडा टेळे यांनी आदर्श व्यवस्थापनातून भातशेतीत नाव मिळविले आहे.
३- भात पीकस्पर्धेत सुळकुड गावातील शेतकरी आवर्जून भाग घेतात.


भातशेतीत सुळकुड गावाने तयार ओळख

राजकुमार चौगुले

कोल्हापूर जिल्ह्यातील सुळकुड (ता. कागल) या गावाने उसापाठापोठा भातशेतीत आपली ओळख तयार केली आहे. सामूहिक नियोजन, शास्त्रीय व्यवस्थापनावर भर देत येथील शेतकऱ्यांनी भाताची उत्पादकता वाढवली आहे. राज्य पीक स्पर्धेत गावातील शेतकरी यशस्वी ठरले आहेत.
...........................................................
कोल्हापूर जिल्ह्यात कागल तालुक्यातील सुळकुड हे सुमारे सातहजार लोकसंख्या असलेले समृद्ध कृषिप्रधान गाव आहे. दूधगंगा नदीच्या काठावर वसलेल्या या गावाला निसर्गाची मोठी साथ लाभली आहे. शंभर टक्के क्षेत्र बागायतीखाली आहे. सुपीक काळी कसदार जमीन, मुबलक पाणी आणि अनुकूल हवामान यामुळे सुळकुड गावची शेती जिल्ह्यात आदर्श मानली जाते. गावातील शेतीचा कणा म्हणजे ऊस पीक. सुमारे ९० टक्के क्षेत्रावर हे पीक दिसून येते. सुधारित वाण, ठिबक सिंचन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यातून येथील शेतकऱ्यांनी एकरी सरासरी ७० ते ८० टनांच्या आसपास ऊस उत्पादन साध्य केले आहे. या पिकातून आर्थिक स्थैर्यदेखील त्यांनी मिळविले आहे.

भातशेतीसाठी गावची ओळख

उसाव्यतिरिक्त भुईमूग, ज्वारी, सोयाबीन आदी पिकेही गावातील शेतकरी घेतात. भाताचे क्षेत्र १० टक्क्यांच्या आसपास आहे. मात्र उसाच्या पाठापोठ उत्पादन व गुणवत्ता यांच्या अनुषंगाने येथील शेतकऱ्यांनी भातशेतीतही आपली वेगळी ओळख तयार केली आहे. त्यासाठी सुधारित वाणांचा अवलंब केला आहे. अन्नद्रव्ये व सिंचन नियोजनाचाही तेवढाच वाटा आहे. राज्यस्तरीय भात उत्पादन स्पर्धेत गावातील शेतकरी दरवर्षी पहिल्या तीन क्रमांकांमध्ये स्थान मिळवतात. हे विशेष म्हणावे लागेल. अर्थात या यशामागे कोणतीही जादू नसून सामूहिक नियोजन, शास्त्रीय दृष्टिकोन, प्रयोगशील वृत्ती आणि परस्पर सहकार्याची संस्कृती हीच त्यामागील कारणे आहेत.

एकमेकां करू साह्य

गावातील भातशेतीबाबत बोलायचे तर उसाचा खोडवा निघाल्यानंतर आडवी-उभी नांगरणी, सेंद्रिय खतांचा वापर, बीजप्रक्रिया आदी कामांना दिशा मिळते. बहुतांश शिवारे एकमेकांना लागून आहेत. एका शेतातील काम पूर्ण झाल्यावर त्याच शेतकऱ्याच्या मदतीने पुढील शेतकऱ्याच्या शेतातील काम सुरू होते. त्यामुळे मजुरांची कमतरता जाणवत नाही आणि सर्वांची कामे वेळेत पूर्ण होतात. या सामूहिक कार्यपद्धतीमुळे मजुरीचा खर्चही मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. गावातील २५ शेतकऱ्यांनी बसवेश्वर कृषी शेतकरी गट स्थापन केला आहे. शासन आणि पाणी फाउंडेशन यांच्या विविध उपक्रमांमध्ये हा गट सहभागी होतो. सामूहिक शेती व्यवस्थापनाचा आदर्श त्याने निर्माण केला आहे. सतत नवे प्रयोग करण्याच्या वृत्तीमुळे प्रत्येक हंगामात एखाद्या नव्या तंत्रज्ञानाची किंवा पद्धतीची चाचणी घेतली जाते. यंदा प्रथमच काही शेतकऱ्यांकडे यांत्रिक भात पेरणीचा प्रयोग करण्यात आला आहे. पारंपरिक टोकण पद्धतीच्या तुलनेत ही पद्धत अधिक फायदेशीर ठरते का याचा तुलनात्मक अभ्यास केला जात आहे. व्यवस्थापनातील प्रत्येक बाबीची, न परिणामांची व निष्कर्षांची नोंद ठेवली जाते. वाणांविषयी बोलायचे तर नदीकाठच्या पाणथळ क्षेत्रात खासगी कंपन्यांच्या संकरित वाणांना प्राधान्य दिले जाते. तर तुलनेने कमी पाणी उपलब्ध असलेल्या माळरान भागात इंद्रायणी सारख्या सुधारित वाणांची लागवड होते.

उत्पादन व अर्थकारण

नियोजनबद्ध शेती आणि सामूहिक कार्यपद्धतीतून उत्पादन खर्चात सुमारे ४० ते ५० टक्क्यांपर्यंत बचत झाल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. सन २०११-१२ मध्ये गावातील जे शेतकरी हेक्टरी सरासरी ८० ते ९० क्विंटलपर्यंत उत्पादन घ्यायचे ते आज हेक्टरी १०० क्विंटलच्या पुढे उत्पादन घेऊ लागले आहेत. राज्य भात पीक स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावत येथील शेतकऱ्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. आज त्यांची भातशेती अन्य शेतकरी, कृषी अधिकारी व अभ्यासकांसाठी प्रात्यक्षिक केंद्र बनले आहे. धोंडिराम कतगर, मलगोंडा टेळे, विशाल पर्वते, सदाशिव कतगर, बाबूराव परीट आदी शेतकऱ्यांनी भात पीक स्पर्धेत दबदबा निर्माण केला आहे. गावातील कलगोंडा टेळे हे देखील त्यापैकीच एक आहेत. चार एकर शेती असलेल्या टेळे यांच्याकडे भात, ऊस आणि काही प्रमाणात भाजीपाला आहे. सन २०११ पूर्वी ते पारंपरिक पद्धतीने भात घ्यायचे. शेतीशाळेत प्रशिक्षण घेतल्यानंतर व्यवस्थापनात सुधारणा करीत त्यांनाही एकरी ४० क्विंटलच्या आसपास उत्पादकता मिळू लागली आहे.

कृषी विभागाचे सहकार्य

विभागीय कृषी संचालक कार्यालय, कोल्हापूर तसेच तालुका कृषी अधिकारी व कर्मचारी यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभले आहे. नियमित शिवारभेटी, प्रात्यक्षिके, शेतीशाळा आणि स्पर्धांमधील सहभागामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला. एका शेतकऱ्याने केलेला प्रयोग दुसऱ्याने स्वीकारला. स्पर्धेपेक्षा अनुभवांची देवाणघेवाण झाली. याच सकारात्मक वातावरणामुळे गावात शास्त्रीय भातशेतीची चळवळ उभी राहिली. आज अन्य भागातील शेतकरी सुळकूडला भेट देऊन या पद्धतीचा अभ्यास करतात.

कलगोंडा टेळे, ९३७२८९०८४५
गणेश कतगर, ९९७५५२९१८८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR नंतर मतदार यादीतून नाव वगळलं तर नागरिकत्व रद्द होणार? सुप्रीम कोर्टाचे 8 ऐतिहासिक निर्णय; प्रत्येक भारतीयाने जाणून घ्यावेत असे निकाल

Dombivli: तिकीट काउंटरवर नागाचा डेरा, डोंबिवली रेल्वे स्थानकावर गोंधळ, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण; Video Viral

Live Updates Marathi: ठाकरेंना झटका! ६ फुटीर खासदारांना मान्यता

Hunger Strike: उपोषण केल्यावर शरीरात नेमके काय बदल होतात? १५ दिवसांपेक्षा जास्त काळ उपाशी राहण्याचे परिणाम

अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांच्या आईची हजारोंची सायबर फसवणूक; वर्षभराने पोलिसांनी परत मिळवून दिली रक्कम

SCROLL FOR NEXT