पुणे, ता. ८ : येरवडा येथील आदित्य नारायण सहकारी गृहरचना संस्था (एम-२४) या सुमारे ४० वर्षे जुन्या म्हाडा इमारतीच्या पुनर्विकासासाठी सादर केलेल्या आराखड्यास तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी सोसायटीने म्हाडा आणि पुणे महापालिकेकडे केली आहे. लोड बेअरिंग पद्धतीने बांधलेली ही इमारत अत्यंत जीर्ण, कमकुवत व धोकादायक झाली असून स्लॅबचे तुकडे कोसळणे, गळती आणि सळ्या उघड्या पडण्याच्या घटना घडत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सोसायटीने अभिहस्तांतरण, भाडेपट्टा, विक्रीखत, प्रॉपर्टी कार्ड, स्ट्रक्चरल ऑडिट, अग्निशामक, पर्यावरण, एअर फोर्सचे ना-हरकत प्रमाणपत्र, म्हाडाचे ना-देय प्रमाणपत्र तसेच पुनर्विकासासाठी आवश्यक सर्व परवानग्या पूर्ण केल्याचे अध्यक्ष प्रशांत खंडाळे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद आहे. दोन वर्षांपूर्वी पुनर्विकासाचा प्रस्ताव सादर करूनही आराखडा मंजूर झालेला नसल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तातडीने इमारत पाडण्यास व नवीन बांधकाम आराखड्यास मंजुरी न दिल्यास संभाव्य जीवितहानीची जबाबदारी म्हाडा व महापालिकेची राहील, असा इशाराही सोसायटीने दिला आहे.
म्हाडाच्या एका इमारतीला बांधकाम परवानगी देता येत नाही. म्हाडाचा आराखडा सुधारण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यास मान्यता मिळाली तर प्रत्येक इमारतीला बांधकाम परवानगी देता येईल. आता परवानगी देता येणार नाही. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.
- अनिरुद्ध पावसकर, शहर अभियंता, पुणे महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.