पुणे

निवेदन

CD

ग्रामपंचायतीच्या आठ कर्मचाऱ्यांना पदस्थापना
सातारा, ता. १० : ग्रामपंचायत स्तरावर दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अनुभवाची दखल घेत सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने दहा टक्के ग्रामपंचायत कर्मचारी कोट्यातून आठ पात्र कर्मचाऱ्यांना पदस्थापना देण्यात आली. यामध्ये चार कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यक (प्रशासन), तर चार कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवक पदावर संधी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वर्षे ग्रामपंचायत स्तरावर सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवेला न्याय मिळाला आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी दहा वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार, सेवा ज्येष्ठता आणि उपलब्ध पदांचा विचार करून दहा टक्के कोट्यातून पदस्थापनेसाठी पात्रता निश्चित केली जाते. त्यानुसार पात्र कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेच्या आधारे पदस्थापना देण्यात आली. नियुक्ती आदेशांचे वितरण जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या वेळी आमदार धैर्यशील कदम, उपाध्यक्ष राजू भोसले, समाज कल्याण समितीचे सभापती ऋषिकेश धायगुडे-पाटील यांच्यासह सदस्य, जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ग्रामपंचायत कर्मचारी हे ग्रामीण प्रशासनाचा महत्त्वाचा घटक असून, शासनाच्या विविध योजना व विकासकामे तळागाळापर्यंत पोहोचविण्यात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. पदस्थापनेमुळे त्यांच्या अनुभवाचा जिल्हा परिषद प्रशासनाच्या कामकाजासाठी उपयोग होणार असून, नव्या पदावर अधिक जबाबदारीने काम करण्याची संधी मिळणार आहे.

................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डीएसपी ब्लॅक, स्मिरनॉफसह अनेक ब्रँडना फटका! FSSAIच्या तपासणीत मोठा खुलासा; १८ हजार पेट्या जप्त, कारण काय?

Bhimashankar Temple : श्रावणापासून भीमाशंकर मंदिर पहाटे ५ ते रात्री ९.३० पर्यंत दर्शनासाठी खुले

रेस्टॉरंटमध्ये जाणाऱ्यांसाठी मोठी माहिती! बाहेरचं खाणं किती सुरक्षित? धक्कादायक अहवाल समोर, जेवायला जाण्याआधी 'ही' बातमी वाचाच

"मला फरक पडत नाही तो १५ चा आहे की १८...", Vaibhav Sooryavanshi बद्दल ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली नेमकं काय म्हणाला?

Scholarship Exam Result : चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्तीचा अंतिम निकाल जाहीर

SCROLL FOR NEXT