पुणे

मनोहर भोसले.

CD

सकाळ वृत्तसेवा
करमाळा, ता. ११ : करमाळा तालुक्यातील भाजप एका नेत्याचे भोंदू मनोहरमामा भोसले याच्याशी आर्थिक संबंध असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर भिगवणजवळील एका शिक्षण संस्थेत पोलिसांकडून रात्रीपासून चौकशी व कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांचे पथक रात्री भिगवणजवळील शिक्षण संस्थेच्या परिसरात दाखल झाले. त्यानंतर संस्थेतील कार्यालयीन कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांशी संबंधित नोंदी, संगणकीय माहिती तसेच अन्य संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. सकाळपर्यंतही पोलिसांची संस्थेतील उपस्थिती कायम असल्याची माहिती आहे. या कारवाईदरम्यान करमाळा तालुक्यातील भाजप नेते संस्थेत उपस्थित असल्याचे निदर्शनास आले आहे.
दरम्यान, संस्थेशी संबंधित एका प्राध्यापकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यांना नेमक्या कोणत्या कारणासाठी ताब्यात घेण्यात आले, त्यांच्याकडून कोणती माहिती घेण्यात आली किंवा त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
मनोहर भोसले याच्याशी करमाळा तालुक्यातील भाजप नेत्याचे कथित आर्थिक संबंध असल्याचे आरोप यापूर्वी करण्यात आले आहेत. या आरोपांच्या अनुषंगानेच पोलिसांकडून भिगवणजवळील शिक्षण संस्थेतील आर्थिक व्यवहार व संबंधित कागदपत्रांची तपासणी केली जात असल्याची चर्चा आहे. मात्र, संबंधित नेते आणि भोसले यांच्यात प्रत्यक्ष कोणत्या प्रकारचे आर्थिक व्यवहार झाले, याबाबत अद्याप अधिकृत तपशील समोर आलेला नाही.

चौकट
पोलिस अधीक्षक घेणार पत्रकार परिषद
भिगवणजवळील शिक्षण संस्थेवरील पोलिसांच्या कारवाईसंदर्भात पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: डिफेंडर कारवरून टीका; मनोज जरांगे पाटलांनी कराडच्या सभेत दिलं थेट उत्तर, म्हणाले...

Alephata Crime : मानसिक छळामुळे तरुणीने संपविले जीवन; शिक्षकावर गुन्हा दाखल

समृद्धीवर १२०च्या स्पीडने गाड्या धावतात, नो पार्किंगमध्ये कंटेनर लावला, गंभीर अपघाताची शक्यता; त्या चालकावर गुन्हा दाखल, आरटीओकडून कारवाई

Shirur Accident : पुणे-नगर रस्त्यावर अपघात; एन्डेवर चालक व दूचाकीस्वाराचा जागीच मृत्यु

Viral Video : 'या' शहराच्या मातीत विखुरलय सोनं, लोक वेचून कमवाताहेत लाखो रुपये; पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT