पुणे

हेड लाचखोरीची आता ऑनलाइन नोंदणी

CD

नवी दिल्ली, ता.१७ (वृत्तसंस्था) ः देशातील लाचखोरीच्या घटनांची नोंद ठेवण्यासाठी दिल्लीतील एका विद्यार्थ्याने Bribes.fyi हे संकेतस्थळ तयार केले आहे. या फ्री क्राउडसोर्स प्लॅटफॉर्मवर लाचखोरीच्या घटनांची नोंद करता येईल. शासकीय कार्यालयांमध्ये लाचेची मागणी करण्यात आल्यास किंवा लाच देण्यास नकार दिल्यास नागरिकांना त्याबाबतचा तपशील येथे नोंदविता येईल. या प्लॅटफॉर्मच्या निर्मितीमागे ‘महाराजा अग्रसेन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’चा बी.टेकचा विद्यार्थी आर्यन निषाद हा आहे. या संकेतस्थळावर भ्रष्टाचाराच्या तक्रारींचा तपशील सादर केला जाईल. विभाग, शहर आणि राज्यानुसार या माहितीचे वर्गीकरण करण्यात येईल.

संकेतस्थळासाठी एआय
- डोमेनच्या तपशिलानुसार या संकेतस्थळाची नोंदणी NameCheap Inc कडे करण्यात आली आहे. ही वेबसाइट २ जुलै रोजीच सक्रिय झाली आहे. निषादने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून या संकेतस्थळाची निर्मिती केल्याचे तिच्या मांडणीवरून दिसते.

हे तपशील देऊ शकता
- कोणत्याही व्यक्तीला या प्लॅटफॉर्मवर संबंधित सरकारी विभाग, कथितरीत्या मागितलेली लाच आणि ज्या शहरामध्ये ही घटना घडली त्याचा तपशील ही मुलभूत माहिती सादर करता येईल. तुम्ही संबंधित अधिकाऱ्याला लाच दिली की नाकारली हे देखील नमूद करू शकता.

डेटा बनतो अनामिक पोस्ट
- माहिती नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारणपणे एक मिनिट कालावधी लागतो, त्यानंतर वैयक्तिक ओळख पटवणारी माहिती काढून हा अहवाल सार्वजनिकरीत्या शोधण्यायोग्य डेटाबेसला जोडला जातो. हा अहवाल प्रसिद्ध झाल्यावर तो वेबसाइटवर अनामिक पोस्ट म्हणून दिसतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा! विनोद तावडे, वसुंधरा राजे अन् स्मृती इराणी यांच्याकडे मोठी जबाबदारी, वाचा यादी...

खराब अन्न मिळालं? आता QR कोड स्कॅन करा, फोटो-व्हिडिओसह तक्रार करा, FDA चा मोठा निर्णय, नेमकी सुविधा काय?

'धर्मवीर' पाहिल्यावर रस्त्यावर प्रसाद ओकची वाट पाहत थांबलेले उद्धव ठाकरे; अभिनेत्याने सांगितला तो प्रसंग; म्हणाला- त्यांनी...

Marathi News Live Updates : नागपूरात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस

IND vs SL 1st Test: श्रीलंकेचा पलटवार, भारताचे गोलंदाज झाले गार! २०१५ मध्ये जे घडलं होतं, तसंच होण्याची भीती; गौतम गंभीरला आठवलं तेव्हा नेमकं काय झालेलं...

SCROLL FOR NEXT