पुणे

विविध उपक्रमांनी दिवाळीचा आनंद द्विगुणित

CD

पिंपरी, ता. ९ ः दिवाळीनिमित्त विविध संस्था- संघटनांनी विविध उपक्रम राबवून दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. काव्य पहाट, दिवाळी पहाट अशा सांगीतिक कार्यक्रमासह वंचित घटकांना सन्मान काही संस्थांनी केला. त्यांच्या जीवनात आनंद भरण्याचा प्रयत्न केला.

‘मसाप’ची काव्य पहाट
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे आयोजित ‘दिवाळी काव्य पहाट’ कवी संमेलन निगडीतील शांता शेळके सभागृहात उत्साहात झाले. ज्येष्ठ साहित्यिक गिरीश प्रभुणे, महापालिकेचे उपायुक्त पंकज पाटील, मसाप शाखाध्यक्ष प्रा. राजन लाखे, उपाध्यक्ष डॉ. रजनी शेठ, पत्रकार विवेक इनामदार, नाना कांबळे आदी उपस्थित होते. गणेश वंदना, स्वागत गीत व प्रश्नमंजुषावर आधारित गीते भगवंत वलोकर, रिचा राजन आणि भूषण तोष्णीवाल यांनी सादर केली. प्राची देशपांडे, माधुरी मंगरूळकर, प्रतिमा काळ, शशिकला देवकर, अनघा पाठक, नीलिमा जोशी, कमल सोनजे, जयश्री श्रीखंडे, नरहरी वाघ, मीना शिंदे, दामोदर कुलकर्णी, ज्ञानेश्वर शिळवणे आदींनी रचना सादर केल्या. कामगार विषयावरील काव्यस्पर्धेतील विजेते डॉ. प्रसन्न टिळेकर, प्रदीप माने, डॉ. मीनल लाड, विनायक डेग्वेकर, प्रकाश परदेशी, प्रतिमा काळे यांना पारितोषिक देऊन गौरविले. ‘चालता बोलता आणि गाणी गप्पा’ कार्यक्रमाने रंगत आणली. संजय जगताप यांनी सूत्रसंचालन केले.

कचरावेचक महिलांचा सन्मान
महापालिकेच्या घंटागाडीवरील कचरा संकलक महिला व वृत्तपत्र विक्रेत्या महिलांचा मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेने सन्मान केला. प्रत्येक महिलेस दोन साड्या, जीवनावश्यक वस्तू व फराळ दिला. संस्थेचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, महिला शहराध्यक्षा संजना करंजावणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, उपाध्यक्ष काळुराम लांडगे, राजगुरुनगरचे अध्यक्ष शंकर नाणेकर, सामाजिक कार्यकर्ते सतीश हंचाटे, नीलेश हंचाटे, अरविंद मांगले, अलका लोंढे, जयश्री मोरे, जयश्री मस्के, राणू बिराजदार, आशा जाधव आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Politics : "गोकुळचं दार मी उघडलं म्हणून..."; महायुतीच्या दोन बड्या मंत्र्यांवर सतेज पाटलांचा थेट प्रहार!

Rocket Firecrackers Ban: दिवाळीच्या उत्साहावर नियमांचं बंधन! मुंबईत रॉकेट फटाक्यांवर बंदी; महापालिकेचा मोठा निर्णय

Mumbai Airport: मुंबईतून परदेशात जाणाऱ्या 'त्या' प्रवाशांना आता नवी मुंबई गाठावी लागणार? १२ कंपन्यांचा विरोध का?

Maharashtra Live News: जालना जिल्ह्यातील भिलपुरी गावात पोहोचले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Vivekanand Patil Gokul Politics : आम्हाला चोरमन नको, आमच्या हक्काचा चेअरमन हवा; गोकुळच्या मोर्चात विवेकानंद पाटील यांची आक्रमक तोफ धडाडली

SCROLL FOR NEXT