पुणे

‘एसटी’ ऑनलाइन आरक्षण प्रणाली कोलमडली

CD

पुणे, ता. १४ : दिवाळीची सुट्टी संपवून नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी पुन्हा पुण्याकडे परतणाऱ्या प्रवाशांना शनिवारी (ता. १४) मोठ्या मनस्तापाचा सामना करावा लागला. राज्य परिवहन महामंडळाच्या ऑनलाइन तिकीट प्रणालीत अचानक बिघाड झाल्याने हजारो प्रवाशांना तिकिटासाठी ‘वेटिंग’वर राहावे लागले. ‘एसटी’च्या अधिकृत मोबाइल ॲप आणि संकेतस्थळाचे सर्व्हर डाऊन झाल्याने ऑनलाइन आरक्षणाचा पुरता बोजवारा उडाला होता.
दिवाळीची सुट्टी संपल्याने शनिवारपासून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. राज्यभरातून लाखो नागरिक पुण्यासह इतर प्रमुख शहरांकडे परतत आहेत. सोमवारपासून अनेकांना कामावर हजर राहायचे असल्याने शनिवारी आणि रविवारी प्रवाशांची सर्वाधिक गर्दी असते. ही गर्दी लक्षात घेऊन ‘एसटी’ महामंडळाने जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. मात्र, आपला प्रवास सुखकर व्हावा म्हणून ‘एसटी’च्या अधिकृत वेबसाइट किंवा मोबाइल ॲपवरून तिकिटाचे आरक्षण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशांच्या पदरी शनिवारी निराशाच पडली. तिकीट बुक करताना ‘एरर’ येणे, पेमेंट गेटवेवर अडचण येऊन पैसे कटूनही तिकीट न मिळणे किंवा वेबसाइटच न उघडणे अशा अनेक तांत्रिक अडचणींचा सामना प्रवाशांना करावा लागला. यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अनेकांना आरक्षण न मिळाल्यामुळे बसस्थानकांवर जाऊन थेट तिकीट (करंट बुकिंग) काढण्यासाठी धाव घ्यावी लागली. ‘एसटी’च्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) विभागाने या बिघाडाची दखल घेत तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. अखेर सायंकाळनंतर तिकीट प्रणालीतील हा बिघाड दूर करण्यात प्रशासनाला यश आले आणि तिकीट प्रणाली पुन्हा कार्यान्वित झाली. मात्र, सकाळपासून ते सायंकाळपर्यंतच्या या वेळेत हजारो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.

खासगी ट्रॅव्हल्सकडून लूट
‘एसटी’ची ऑनलाइन तिकीट प्रणाली नेमकी गर्दीच्या दिवशीच कोलमडल्याचा थेट फायदा खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी उचलला. सोमवारी कामावर पोहोचण्याची घाई असलेल्या प्रवाशांना दुसरा कोणताही पर्याय उरला नसल्याने त्यांनी नाइलाजाने खासगी बसेसचा आधार घेतला. नेमक्या याच संधीचा फायदा घेत ट्रॅव्हल्स चालकांनी दुप्पट ते तिप्पट भाडेवाढ करत प्रवाशांची आर्थिक लूट केली. यामुळे ‘एसटी’च्या तांत्रिक चुकीचा मोठा आर्थिक फटका सामान्य प्रवाशांना बसला.

बसस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी
परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने स्वारगेटसह वाकडेवाडी, वल्लभनगर बसस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून आली. ‘एसटी’ प्रशासनाने परतीच्या प्रवासासाठी जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला. मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातून पुण्यात दाखल होणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे.

‘एसटी’च्या ऑनलाइन तिकीट यंत्रणेवर ताण वाढल्याने काही काळासाठी सर्व्हर डाऊन झाले होते. मात्र महामंडळाने तातडीने उपाययोजना करून तिकीट प्रणाली पुन्हा कार्यान्वित केली. त्यामुळे तिकिटांचे बुकिंग पूर्ववत झाले.
- अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी विभाग, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Asia Cup Final: पाकिस्तानच्या जबड्यातून विजय खेचला; आपला भारत आशियाचा राजा झाला

Traffic Jam: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा; मुंबई-गोवा महामार्गावरही कोंडी

Gavit Sisters Case : भारतात पहिल्यांदा महिलांना मिळणार होती फाशी; कोल्हापूरच्या गावित बहिणींचं क्रौर्य ऐकून थरकाप उडेल!

महाराष्ट्रासाठी अभिमानाची बातमी! लोणार सरोवराला 'जागतिक भूगर्भीय वारसा स्थळाचा' दर्जा; ठरलं भारतातील दुसरं ठिकाण

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग लागू होण्याआधी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? एरिअर्स आणि वाढीव पेन्शन मिळणार की नाही?

SCROLL FOR NEXT