PNE26W28610
अहिल्यानगर ः केडगाव येथील सरस्वती विद्या मंदिर येथे एआय प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले.
मराठी शाळा तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत पुढे
दादाराम ढवाण ः विद्यार्थी गिरविणार ‘एआय’चे धडे
अहिल्यानगर, ता. २० ः आजच्या आधुनिक युगात शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत गरजेचा आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या बरोबरीने मराठी माध्यमाच्या शाळाही आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करत असल्याचे प्रतिपादन दादाराम ढवाण यांनी केले.
केडगाव येथील डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान संचालित सरस्वती प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी नवनीत एआय सिस्टिम उपलब्ध करून देण्यात आले. या अत्याधुनिक प्रणालीचे उद्घाटन नगर केंद्राचे अध्यक्ष ढवाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे कार्यवाह सोमनाथ दिघे, संस्थेचे सहकार्यवाह डॉ. रवींद्र चोभे, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य दादासाहेब काजळे, शाळेचे मुख्याध्यापक संदीप भोर, तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. दिघे म्हणाले की, शिक्षणामध्ये नवीन प्रयोग आणि बदल स्वीकारणे ही काळाची गरज आहे. एआय प्रणालीमुळे शिक्षकांच्या अध्यापनाला अधिक प्रभावी दिशा मिळेल आणि विद्यार्थ्यांना विषय समजून घेण्याची नवीन पद्धत उपलब्ध होईल. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत निश्चितच वाढ होईल, असे ते म्हणाले.
नवीन सक्षम इंटरॅक्टिव्ह पॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दृकश्राव्य पद्धतीने अध्यापन, शैक्षणिक व्हिडिओ, थेट प्रात्यक्षिके, ऑनलाइन अध्ययन साहित्य, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित विविध शैक्षणिक साधनांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची आकलन क्षमता, सहभाग आणि अभ्यासातील रुची वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.