जलवाहिनीच्या स्थलांतरणास वेग
लकडी पूल पाडण्यापूर्वी पालिकेने काम केले सुरू
सातारा, ता. २३ : पाचशे एक पाटी ते बुधवार नाका या परिसराला जोडणाऱ्या लकडी पुलाचे पाडकाम पालिकेकडून आगामी काळात हाती घेण्यात येणार आहे. ते काम करण्यापूर्वी येथील जलवाहिन्यांचे स्थलांतरण पालिकेने हाती घेतले आहे.
ब्रिटिशकालीन असणाऱ्या लकडी पुलावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. वाढणारी वाहतूक आणि विस्तारलेल्या लोकवस्तीमुळे हा पूल दिवसेंदिवस वाहतुकीसाठी अरुंद आणि अपुरा पडत होता. पूल वापरयोग्य नसल्याने त्याचा भार पेलण्याची क्षमता कमी झाल्याने तो पाडण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. त्यानुसार या ठिकाणाची पाहणी करत पालिकेने येथे नवीन पूल बांधण्यासाठीचा आराखडा तयार केला होता. पहिल्या टप्प्यात येथील जलवाहिन्या स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार येथील ओढा ओलांडत वाहिन्या नेण्यासाठी लोखंडी जाळी टाकली होती. हे काम पूर्ण झाल्यानंतर पालिकेने त्यावर वाहिन्या जोडण्याचे काम गेल्या दोन दिवसांपासून हाती घेतले आहे. हे काम गतिमान असून, वाहिनी जोडल्यानंतर पाणीपुरवठ्याची तांत्रिक तपासणी करण्यात येईल. त्यानंतर पुलाबाबतची पुढील कार्यवाही पालिकेमार्फत पावसाळा संपल्यानंतर हाती घेतली जाण्याची शक्यता आहे.
................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.